हैद्राबादमध्ये निजामाच्या कोट्यवधींच्या महालाची परस्पर विक्री
Updated On:

दोन माजी कर्मचाऱ्यांचा प्रताप
नवी दिल्ली : हैद्राबादेतील निजामाचा कोट्यवधींचा महाल परस्पर विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैद्राबादमधील तब्बल 300 कोटी रुपये किंमतीच्या एका महालाची मुंबईतील एका बांधकाम व्यवसाय करणाऱ्या कंपनीतील माजी कर्मचाऱ्यांनी परस्पर विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. हैद्राबादच्या हैदरगुडामध्ये हा महाल किंग कोठीच्या नावाने प्रसिद्ध आहे.
या दोन कर्मचाऱ्यांनी काश्मीरच्या एका हॉटेल व्यावसायिकाला या महालाची परस्पर विक्री करत, कंपनीला चुना लावला आहे. विशेष म्हणजे या महालाची विक्री करून या कर्मचाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. याप्रकरणी कंपनीकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावरून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.




