Musheer Khan : मुशीर खानचा इंग्लंडमध्ये मोठा धमाका! साकारली शतकांची हॅट्ट्रिक

Musheer Khan’s Sensational England Tour : मुंबईचा युवा क्रिकेटपटू आणि भारतीय कसोटी संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सर्फराझ खानचा भाऊ मुशीर खान सध्या इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. तो मुंबई इमर्जिंग संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये शतके ठोकणाऱ्या मुशीरने तिसऱ्या सामन्यात शतकांची हॅटट्रिक पूर्ण केली. त्याच्या फलंदाजीसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल दिसत आहेत. शिवाय, गोलंदाजीतही तो अप्रतिम कामगिरी करत आहे.
तिसऱ्या सामन्यातही झळकावले शतक –
गेल्या वर्षी कार अपघातात मानेला गंभीर दुखापत झाल्यानंतर मुशीरने रेड बॉल क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन केले. आता तो इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालत आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये शानदार शतके ठोकणाऱ्या मुशीर खानने तिसऱ्या सामन्यातही लॉफबोरो यूसीसीई संघाविरुद्ध शतक झळकावले. त्याने ११६ चेंडूंमध्ये १४ चौकार आणि १ षटकारासह १०२ धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट ८७.९३ होता.
First match – Hundred.
Second match – Hundred.
Third match – Hundred.THIRD CONSECUTIVE HUNDRED FOR MUSHEER KHAN IN THE ENGLAND TOUR FOR MUMBAI EMERGING TEAM. 🇮🇳
The Future Star of Indian Cricket. pic.twitter.com/CVpo7EcoFV
— Johns. (@CricCrazyJohns) July 7, 2025
यापूर्वी ३ जुलै रोजी मुशीरने चॅलेंजर्स (कंबाईन नॅशनल काउंटीज) संघाविरुद्ध शतकासह १० विकेट्स घेतले होते. या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने १२७ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि एका षटकारासह १२५ धावांची शानदार खेळी केली होती. तसेच, चॅलेंजर्सच्या पहिल्या डावात त्याने ३८ धावांत सहा विकेट्स आणि दुसऱ्या डावात ५६ धावांत चार विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना अनिर्णित राहिला.
हेही वाचा – IND vs ENG : कर्करोगाशी लढताना भावाचा आधार; ज्योतीने सांगितली आकाशच्या विजयाची भावनिक गोष्ट
पहिल्या सामन्यातही शतकीय खेळी –
मुशीर खानने ३० जून रोजी नॉटिंघमशरच्या सेकंड इलेव्हनविरुद्ध पहिल्या डावात शानदार शतक ठोकले होते. त्याने १२७ चेंडूंमध्ये १४ चौकारांसह १०० धावांचा टप्पा गाठला आणि एकूण १२३ धावा केल्या. हा सामनाही अनिर्णित राहिला. या सामन्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) प्रथम फलंदाजी करत ४४८ धावा केल्या होत्या.
हेही वाचा – DPL 2025 Auction : दिग्वेश राठीचं चमकलं नशीब! DPL मध्ये लागली IPL पेक्षा जास्त बोली!
त्यानंतर नॉटिंघमशरला २०१ धावांत गुंडाळले. फॉलोऑन खेळताना यजमान संघाने दुसऱ्या डावात २५० धावांत ७ विकेट्स गमावल्या आणि सामना अनिर्णित राहिला. मुशीर खानच्या या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीमुळे तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.





