DPL 2025 Auction : दिग्वेश राठीचं चमकलं नशीब! DPL मध्ये लागली IPL पेक्षा जास्त बोली!

DPL 2025 Auction Digvesh Rathi Expensive Player : दिल्लीचा स्टार गोलंदाज दिग्वेश राठीने आयपीएल २०२५ लखनौ सुपर जायंट्ससाठी शानदार कामगिरी केली होती. त्याच्या मिस्ट्री स्पिन गोलंदाजीबरोबरच त्याच्या सेलिब्रेशनामुळे तो चर्चेत राहिला. याच कारणामुळे दिग्वेशवर एका सामन्यासाठी बंदीही घालण्यात आली होती. मागील हंगामात दिल्ली प्रीमियर लीग (डीपीएल) मधील कामगिरीमुळे दिग्वेश चर्चेत आला होता. डीपीएल २०२५ च्या लिलावात तो दुसरा सर्वात महाग खेळाडू ठरला. विशेष म्हणजे त्याला आयपीएलपेक्षा जास्त बोली लागली आहे.
आयपीएलपेक्षा डीपीएलमध्ये लागली जास्त बोली –
दिग्वेश राठीला आयपीएलपेक्षा दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी जास्त पैशाची बोली लागली आहे. लखनौ सुपर जायंट्सने त्याला ३० लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये खरेदी केले होते. आता डीपीएलमध्ये खेळण्यासाठी त्याला ३८ लाख रुपये मिळणार आहेत. लिलावात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सने त्याला ३८ लाख रुपयांना खरेदी केले आहे. आयपीएल २०२५ मधील त्याच्या कामगिरीनंतर दिग्वेशसाठी प्रचंड मागणी दिसून आली, जिथे त्याने १३ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या आणि ८.२५ च्या इकॉनमी रेटने गोलंदाजी केली होती.
The rise of Digvesh Rathi is unbelievable! 🔥🤯
He’s set to earn more from the Delhi Premier League than the IPL 2025! 💰👏#DigveshRathi #DPL2025 #IPL2025 #LSG #Sportskeeda pic.twitter.com/sy9FGXrbII
— Sportskeeda (@Sportskeeda) July 7, 2025
दिल्ली प्रीमियर लीगच्या लिलावादरम्यान, पुरानी दिल्ली 6 कडून दिग्वेशला खरेदी करण्याचा प्रयत्न झाला, परंतु दक्षिण दिल्लीच्या संघाने आपल्या स्टार खेळाडूला मिळवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. आयपीएलमध्ये दिग्वेशने शेवटचा सामना मे महिन्यात लखनऊकडून आरसीबीविरुद्ध गट फेरीच्या शेवटच्या सामन्यात खेळला होता. दिल्ली प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात त्याने १० सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या होत्या, आणि त्याची इकॉनॉमी ८ पेक्षा कमी होती.
हेही वाचा – MS Dhoni Birthday : माहीने रांचीमध्ये मित्रांसोबत साधेपणाने साजरा केला वाढदिवस, VIDEO होतोय व्हायरल
सिमरजीत सिंग ठरला सर्वात महागडा खेळाडू –
लिलावात एकूण ५२० खेळाडूंवर बोली लावली गेली. वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंग ला सर्वाधिक बोली लागली. त्याला सेंट्रल दिल्ली किंग्सने ३९ लाख रुपयांना खरेदी केले. मागील हंगामात त्याने लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. भारतासाठी खेळलेला डावखुरा फलंदाज नीतीश राणा (वेस्ट दिल्ली लायन्ससाठी ३४ लाख रुपये) आणि प्रिन्स यादव (न्यू दिल्ली टायगर्ससाठी ३३ लाख रुपये) यांचाही समावेश झाला.





