‘ही कोकणी लोकं…’; मुनव्वर फारुकीने मराठी माणसासाठी वापरले अपशब्द

बिग बॉस विनर आणि कॉमेडियन म्हणून लोकप्रिय असलेला मुनव्वर फारुकी सध्या आपल्या एका वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. त्याने एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये कोकणी माणसाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे मनसेनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुनव्वरच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
जर ह्याने कोकणी माणसांची माफी नाही मागितली तर हा पाकिस्थान प्रेमी मुनावर जिथे दिसेल तिथे त्याला तुडवणार 😡 कोकणी माणूस कसा तुडवतो हे याला समजून दे 😡 याला जो तुडवेल त्याला एक लाखाचे बक्षीस 😡 येवो कोकण आपलंच असा 🙏
असे म्हणून स्वागत करणाऱ्या कोकणी माणसांबद्दल हे उपरे ही भाषा… pic.twitter.com/9u9XjDteL2— Samadhan Sarvankar (@samadhan234) August 12, 2024
मुन्नवरने नेमकं काय म्हटलं?
मुनव्वरच्या एका कार्यक्रमामध्ये लोकांना तो विचारतो की, सगळे मुंबईचेच आहेत ना? इथे येण्यासाठी कुणी प्रवास करुन आलं आहे का? त्यावर प्रेक्षकांमधून एकाने उत्तर दिलं की, मी तळोजावरुन आलोय. आज मी विचारलं तर तळोजा वेगळं झालं आणि जेव्हा यांच्या गावचे लोक विचारतात की, कुठे राहतात, तेव्हा हे लोकं सांगतात की आम्ही मुंबईला राहतो. ही कोकणी माणसं सगळ्यांना च#$ बनवतात. मुनव्वरच्या या जोकवर प्रेक्षकांमधूनही टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट झाला.
याआधीही मुनव्वरवर झाली होती कारवाई
याआधी 2021 मध्ये त्याने एका कार्यक्रमामध्ये हिंदू देव देवतांचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे त्याला इंदौर पोलिसांनी अटक देखील केली होती. फारुकीच्या विरोधात भाजप महापौर मालिनी गौर यांचा मुलगा एकलव्य गौरनं तक्रार केली होती.
कोण आहे मुनव्वर फारुकी
मुनव्वर फारुकी एक स्टार कॉमेडियन आहे. मुनव्वर 31 वर्षांचं एक कॉमेडियन असून तो अनेकदा वादग्रस्त विधानांमध्ये कायमच चर्चेत राहिला आहे. रिऍलिटी टीव्ही शो बिग बॉसमध्ये देखील चर्चेत राहिला. तो या शोचा विनर देखील होता.





