मुंबईकरांचा प्रवास महागणार ! बेस्ट बसच्या दरात दुप्पटीने वाढ; जाणून घ्या नवे दर

Best Bus Ticket | मुंबईकरांचा बेस्टचा खर्च आता महागणार आहे. आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टने तिकिट दरात आणि पासमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाला पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता याचा फटका सर्वसामान्य मुंबईकराना बसणार आहे.
तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत बेस्ट प्रशासनाने भाडेवाढ करण्याचा मुद्दा मांडला होता. बेस्ट प्रशासनाने भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर करून महापालिका आयुक्तांकडे पाठवला होता. त्याला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.
बेस्ट बसचे तिकीट दर किमान ५ रुपये असल्याने यामुळे बेस्टच्या महसूलात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे दिला होता. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला तिकीट दरात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.
पालिका प्रशासनाच्या मंजुरीनंतर वाहतूक विभाग आणि नगरविकास खात्याची मंजुरी तिकीट दरवाढ लागू करण्यात येणार आहे. सध्या बेस्टला दरवर्षी 845 कोटी रुपयांचे महसूल मिळतो. भाडेवाढ केल्यास बेस्टचा वार्षिक महसूल 1400 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. Best Bus Ticket |
साधारण बस
5 किमी अंतरासाठी 5 रुपयांवरुन 10 रुपये तिकीट दर
10 किमी अंतरासाठी 10 रुपयांवरुन 15 रुपये तिकीट दर
15 किमी अंतरासाठी 15 रुपयांवरुन 20 रुपये तिकीट दर
20 किमी अंतरासाठी 20 रुपयांवरुन 30 रुपये तिकीट दर
वातानुकूलित बस
5 किमी अंतरासाठी 6 रुपयांवरुन 12 रुपये तिकीट दर
10 किमी अंतरासाठी 13 रुपयांवरुन 20 रुपये तिकीट दर
15 किमी अंतरासाठी 19 रुपयांवरुन 30 रुपये तिकीट दर
20 किमी अंतरासाठी 25 रुपयांवरुन 35 रुपये तिकीट दर
बेस्ट बसचा मासिक पास
५ किमी अंतरासाठी सध्या ४५० रुपयांचा पास मिळतो. भाडेवाढीनंतर हा पास ८०० रुपयांना मिळेल.
१० किमी अंतरासाठीचा पास भाडेवाढीनंतर १००० रुपयांवरून १२५० रुपये इतका होईल.
१५ किमी अंतरासाठीचा पास १६५० रुपयांऐवजी १७०० रुपयांना मिळेल.
२० किमी अंतरासाठीचा पासही २६०० रुपयांना मिळेल.
वातानुकूलित बसचा मासिक पास
५ किमी अंतराच्या पाससाठी ६०० रुपयांवरून ११०० रुपये मोजावे लागणार.
१० किमी अंतरासाठीचा पास १४०० रुपयांऐवजी १७०० रुपयांना मिळणार.
१५ किमीचा पास २१०० ऐवजी २३०० रुपयांना
२० किमीसाठीचा पास २७०० रुपयांऐवजी ३५०० रुपयांना मिळेल.
हेही वाचा:
‘आशिकी’ फेम अभिनेत्री अनु अग्रवाल अनोख्या वॉकमुळे ट्रोल, Video व्हायरल





