Anu Agarwal troll | ‘आशिकी’ चित्रपटातून रातोरात प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री अनु अग्रवालचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील तिच्या लुक आणि तिच्या वॉकमुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.
व्हायरल व्हिडिओमधील या नवीन लूकमध्ये अनुने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. अनुचा हा व्हिडिओ आता नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत आहे. अनुच्या विचित्र चालण्यावर नेटकरीही कमेंट करत आहेत.
View this post on Instagram
एका युजरने लिहिले, ‘ती साधी चालू शकत नाही, तिला सगळीकडे रॅम्प वॉक करायची गरज नाही.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘ठीक आहे ती ९० च्या दशकातील सुपरस्टार आहे पण ती अशी का चालत आहे.
इतकेच काय तर युजर्सने व्हायरल होत असलेल्या अनुच्या या व्हिडिओची बॉलिवूड अभिनेत्री आणि के. एल. राहुलची पत्नी अथिया शेट्टीच्या वृद्धत्वाशी तुलना केली आहे. एका युजरने लिहिले, “वृद्धापकाळातील अथिया शेट्टी.” सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा :