BCM Election Reservation | बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यातच आता निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 11 नोव्हेंबर रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने पालिका प्रशासनाला दिले आहेत. या आरक्षण सोडतीवर 20 नोव्हेंबरपर्यंत हरकती मागवल्या जाणार आहेत, तर 28 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने पालिका प्रशासनाला दिले आहेत. BCM Election Reservation | आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या काळात प्रस्ताव सादर केला जाणार आहे. आरक्षण सोडतीची जाहीर सूचना 6 नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द केली जाणार आहे. आरक्षणाची सोडत 11 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी प्रारुप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी नाटीस प्रसिध्द केली जाणार आहे. 20 नोव्हेंबर ही प्रारुप आरक्षण, हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे. अंतिम आरक्षण विहित नमुन्यात 28 नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाणार आहे. मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा असून यातीलअनुसुचित जातींसाठी 15 जागा राखीव असणार आहेत. तसेच अनुसुचित जमातींसाठी 2 जागा आणि इतर मागासवर्गीयांसाठी 61 जागा आरक्षित असणार आहेत. उर्वरित जागा या खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत. 50 टक्के जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे इच्छूक उमेदवारांमध्ये उत्सुकतेसह चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. BCM Election Reservation | हेही वाचा: pune : सायकलचे शहर ही ओळख पुन्हा प्रस्थापित होईल