Mumbai Kurla Accident : मुंबईतील कुर्ल्यात क्रेनचा अपघात; 8 ते 10 जण जखमी झाल्याची शक्यता
Mumbai Kurla Accident : अपघातामागचे नेमकं कारण काय? पोलिसांकडून तपास सुरू

Mumbai Kurla Accident : मुंबईतील कुर्ला येथील कुरेशी नगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री डिमोलिशनच्या कामादरम्यान मोठा अपघात झाला. क्रेनने जेसीबी मशीन हवेत उचलल्यानंतर, ती बऱ्याच उंचावर असताना अचानक क्रेन आणि जेसीबी दोन्ही खाली कोसळले.
या क्रेनच्या मदतीने पोकलेन मशीन इमारतीच्या वरच्या भागात नेण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात खाली उभे असणारे 8 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, अग्निशमन दल आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. सध्या क्रेन हटवण्याचे आणि परिसर सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे.
नेमकं काय घडलं ?
कुर्ला आणि ट्रॉम्बे दरम्यान कुरेशी नगर भागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एका प्रकल्पाचे काम सुरु आहे. यावेळी एक जेसीबी मशीन दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत होती. त्यासाठी क्रेनने ही जेसीबी मशीन उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवली जात होती. त्यावेळी हा परिसर खाली करण्यात आला होता. मात्र, काहीजण या भागात मोबाईलवर शुट करत होते. क्रेनने जेसीबी उंचीवर नेला आणि अचानक क्रेन व जेसीबी दोन्ही खाली कोसळले.
क्रेनचा एक भाग दोन घरांवर आणि नंतर रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडला. या भागातून मध्य रेल्वेच्या मालगाड्यांची ये-जा होते. अपघातात एक कार आणि एका ऑटो-रिक्षाचे नुकसान झाले आहे. क्रेनचा काही भाग दोन घरांवर पडल्याने घरांमध्ये असलेल्या नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. Mumbai Kurla Accident
रेल्वे सुरक्षेचाही प्रश्न
क्रेनचा भाग मुंबई लोकलच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर पडल्याने रेल्वे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळाचा परिसर सुरक्षित करण्यात आला. दरम्यान, क्रेन नेमकी कोणत्या कारणामुळे उलटली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. Mumbai Kurla Accident
हेही वाचा:
Crime News : शिरूर तालुक्यातील शेळी चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद





