Sherfane Rutherford : मुंबई इंडियन्सचा ट्रेड डीलचा डबल धमाका! शार्दुल ठाकूरनंतर ‘या’ धडाकेबाज खेळाडूला संघात केले सामील

MI acquires Sherfane Rutherford Trade from GT : आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी फ्रँचायझींनी ट्रेड विंडोचा पूर्ण वापर करण्यास सुरुवात केली आहे. शार्दुल ठाकूरच्या ट्रेड डीलची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच, मुंबई इंडियन्स (MI) संघाने आणखी एक महत्त्वपूर्ण ट्रेड डील करत आपल्या फलंदाजीच्या क्रमाला मोठी धार दिली आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू शेरफेन रुदरफोर्ड याचा गुजरात टायटन्सकडून आपल्या संघात सामील केले आहे.
२.६ कोटी रुपयांमध्ये करार निश्चित –
आयपीएलने या ट्रेडची अधिकृत घोषणा केली असून, हा व्यवहार ‘कॅश डील’ स्वरूपात झाला आहे. रुदरफोर्डला गुजरात टायटन्सने मागील मेगा लिलावात २.६ कोटी रुपये इतक्या किमतीत विकत घेतले होते. आता मुंबई इंडियन्सने हीच रक्कम गुजरात टायटन्सला देऊन रुदरफोर्डला आपल्या संघात समाविष्ट केले आहे.
🚨 NEWS 🚨
Sherfane Rutherford has been traded from @gujarat_titans to @mipaltan.
Details 👉 https://t.co/zi36xK6OHg#TATAIPL | @SRutherford50_ pic.twitter.com/4vlSV88jUv
— IndianPremierLeague (@IPL) November 13, 2025
२७ वर्षीय रुदरफोर्ड हा त्याच्या पॉवर-हिटिंग क्षमतेसाठी ओळखला जातो. मध्यक्रमात किंवा फिनिशरच्या भूमिकेत तो संघाला महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्यासारखा उपयुक्त अष्टपैलू खेळाडू मिळणे मुंबईसाठी एक मोठी जमेची बाजू आहे.
मुंबई इंडियन्सची जय्यत तयारी सुरू –
या ट्रेडमुळे मुंबई इंडियन्सची आगामी हंगामासाठीची तयारी स्पष्टपणे दिसून येते. नुकताच २ कोटी रुपयांमध्ये शार्दुल ठाकूरला आपल्या संघात घेतल्यानंतर लगेचच रुदरफोर्डला संघात सामील करून घेणे, ही मुंबईची आक्रमक रणनीती दर्शवते. रुदरफोर्डने यापूर्वीही आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
आता तो आपल्या जुन्या फ्रँचायझी मध्ये परतला असून, त्याला अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे. या ट्रेडमुळे गुजरात टायटन्सच्या पर्समध्ये लिलावासाठी उपलब्ध रक्कमेत २.६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे, ज्यामुळे त्यांना लिलावात खेळाडू खरेदीसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील.





