Shardul Thakur Trade : IPL 2026 ची पहिली ‘ट्रेड डील’ जाहीर! शार्दुल ठाकूर तब्बल इतक्या कोटीच्या कराराने MI मध्ये सामील

खेळाडू नाही, ‘कॅश डील’ झाली –
आयपीएल २०२६ च्या हंगामातील ही पहिली अधिकृत ट्रेड डील आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा करार खेळाडूंच्या अदलाबदलीचा नसून ‘कॅश डील’स्वरूपात झाला आहे. याचा अर्थ मुंबई इंडियन्सने शार्दुल ठाकूरला त्याच्या मागील सॅलरीच्या रकमेइतकी रक्कम रोख स्वरूपात लखनऊ सुपर जायंट्सला देऊन विकत घेतले आहे. या डीलसाठी मुंबई इंडियन्सने २ कोटी रुपये खर्च केले आहेत. लखनऊ सुपर जायंट्सने देखील शार्दुल ठाकूरला मागील हंगामात २ कोटी रुपयांमध्येच रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून संघात घेतले होते.
आयपीएल प्रेस रिलीजमध्ये काय म्हटले?
🚨 NEWS 🚨
Shardul Thakur has been traded to @mipaltan from @LucknowIPL.
More Details 👉 https://t.co/drd5BdO3fS#TATAIPL | @imShard pic.twitter.com/fG7QcIP07U
— IndianPremierLeague (@IPL) November 13, 2025
आयपीएलने या ट्रेडसंदर्भात जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये सांगितले की, “दोन्ही फ्रँचायझींमध्ये झालेल्या करारानंतर, लखनऊ सुपर जायंट्सचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मुंबईच्या या अष्टपैलू खेळाडूला लीगच्या १८ व्या हंगामासाठी लखनऊने रिप्लेसमेंट म्हणून २ कोटी रुपयांमध्ये निवडले होते, ज्यात त्याने १० सामन्यांमध्ये भाग घेतला होता. आता या अष्टपैलू खेळाडूला मुंबई इने त्याच्या सध्याच्या सॅलरीनुसार, म्हणजेच २ कोटी रुपयांमध्ये ट्रेड केले आहे.”
याआधी अशी चर्चा होती की, शार्दुल ठाकूरला लखनऊकडून रिलीझ करून मुंबई इंडियन्समध्ये (MI) सामील केले जाईल. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सचा युवा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरला लखनऊ सुपर जायंट्सकडे पाठवले जाऊ शकते. मात्र, आता आयपीएलच्या अधिकृत निवेदनाने या चर्चा संपुष्टात आल्या आहेत.





