IPL 2024 : मलिंगासारखी ॲक्शन आणि बुमराहसारखा यॉर्कर…! तरीही कर्णधार हार्दिक पांड्या ‘या’ गोलंदाजाला देत नाही ए संधी…

Mumbai Indians in IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामात मुंबई इंडियन्सची स्थिती फारशी चांगली नाही. आयपीएल 2024 मध्ये, MI आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये केवळ 3 विजय नोंदवू शकला आहे आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजी, विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये, ही आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी कमकुवत दुवा असल्याचे सिद्ध झाले आहे.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात आशुतोष शर्माने मुंबईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला होता. CSK विरुद्धच्या सामन्यातही हार्दिक पंड्या आणि आकाश मधवाल यांची डेथ ओव्हर्समध्ये चांगलीच धुलाई झाली होती. एवढे सगळे होऊनही कर्णधार हार्दिक पांड्या आणि एमआय व्यवस्थापनाने नुवान तुषाराला अजूनही बेंचवरच बसून ठेवले आहे.
नुवान तुषाराकडे आहेत अचूक यॉर्कर्स…
नुवान तुषाराला ( Nuwan Thushara ) आयपीएल 2024 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने 4.80 कोटी रुपये देऊन खरेदी केले होते. त्याच्याकडे मलिंगासारखी ॲक्शन आहे आणि जसप्रीत बुमराहसारखा अचूक यॉर्कर टाकण्याची क्षमता देखील आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंकेसाठी 8 टी-20 सामने खेळताना तुषारा याने आतापर्यंत 11 बळी घेतले आहेत.
ꜱʟɪɴɢ-ʟɪᴋᴇ ᴀᴄᴛɪᴏɴ in 𝕎𝕒𝕟𝕜𝕙𝕖𝕕𝕖 👀 🇱🇰
We’ve read this story before, ℙ𝔸𝕃𝕋𝔸ℕ 😉💙#OneFamily #MumbaiIndians #IPLAuction @malinga_ninety9 pic.twitter.com/mEjXudFBLp
— Mumbai Indians (@mipaltan) December 20, 2023
जसप्रीत बुमराह सातत्याने चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याला इतर गोलंदाजांची साथ मिळत नाही. कर्णधार पंड्यानेही CSK विरुद्ध केवळ एका षटकात 26 धावा दिल्या होत्या. अशा स्थितीत जवळपास 5 कोटी रुपये किमतीच्या विकेट-टेकिंग गोलंदाज नुवान तुषारा याला बेंचवर बसून ठेवणे मुंबई इंडियन्सच्या हिताचे नाही. तुषाराने अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात हॅट्ट्रिक घेत खळबळ उडवून दिली होती. फलंदाजांना त्याची गोलंदाजीची अॅक्शन समजून घेऊन फटकेबाजी करणं सोपे नाही.
View this post on Instagram
मुंबई इंडियन्सची फलंदाजी आतापर्यंत चांगली कामगिरी करत आहे कारण आयपीएल 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या 7 सामन्यांमध्ये संघाने 5 वेळा 180 हून अधिक धावा केल्या आहेत. पण गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा यांची जोडी दिसली, तर एमआयच्या गोलंदाजीला भेदणे कोणत्याही संघाला सोपे जाणार नाही.
जेराल्ड कोएत्झीने आतापर्यंत 12 विकेट घेतल्या आहेत, परंतु 10 च्या इकॉनॉमी रेटने धावाही दिल्या आहेत यावरून मुंबईच्या गोलंदाजीची खराब स्थिती स्पष्ट होते. संघाकडून सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा फलंदाज आकाश मधवाल आहे, ज्याच्या नावावर सध्या फक्त 5 विकेट्स आहेत. केवळ 2 गोलंदाजांच्या जोरावर संघ पुढे वाटचाल करत आहे, अशा परिस्थितीत तुषाराला प्लेइंग इलेव्हनमध्ये आणणे एमआयला म्हणजेच मुंबई इंडियन्सला मजबूत करण्याचे काम करेल.





