MI Cape Town : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, स्टार अष्टपैलू खेळाडू लीगमधून बाहेर; पोलार्डकडे आली कर्णधारपदाची जबाबदारी…

MI Cape Town in SA20 : दक्षिण आफ्रिका टी-20 लीगपूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, दक्षिण आफ्रिका T20 लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचे नाव मुंबई इंडियन्स केपटाऊन आहे. गेल्या मोसमात या संघाचा कर्णधार राशिद खान होता, मात्र या हंगामात राशिद खान दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. राशिद खान न खेळणे हा मुंबई इंडियन्स केपटाऊनसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर राशिद खानच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्स केपटाऊनची कमान कायरॉन पोलार्डकडे असेल.
कायरॉन पोलार्ड आयपीएलमध्ये बराच काळ मुंबई इंडियन्सचा भाग होता. आयपीएल 2010 मध्ये कायरॉन पोलार्ड पहिल्यांदा मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. यानंतर हा कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू आयपीएल 2022 पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळत राहिला. सध्या कायरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट टीमचा भाग आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका T20 लीगसह जगभरातील अनेक लीगमध्ये कायरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करतो.
दक्षिण आफ्रिका T20 लीगचे काय आहे वेळापत्रक?
नुकतेच दक्षिण आफ्रिका T20 लीगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ही स्पर्धा 10 जानेवारीपासून सुरू होत आहे. त्याच वेळी, 10 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिका टी-20 लीगचा विजेतेपद सामना खेळला जाईल. या कालावधीत एकूण 34 सामने खेळवले जाणार आहेत. तसेच या मोसमात 6 संघ सहभागी होणार आहेत. पहिला सामना सनरायझर्स इस्टर्न केप आणि जोहान्सबर्ग सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.
या हंगामातील वेळापत्रकात बदल…
दक्षिण आफ्रिका T20 लीगमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या मालकीच्या सहा संघांचा समावेश आहे. ज्यामध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचा समावेश आहे. या मोसमातील सामन्यांच्या वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले आहेत. यावेळी, बॉल-हेडर म्हणजे एका दिवसात 2 सामने फक्त शनिवारी खेळले जातील, म्हणजे उर्वरित दिवस फक्त 1-1 सामने असतील.





