MI Squad IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा मास्टरस्ट्रोक! कमी पैशात डीकॉकसोबत चार युवा खेळाडूंना केलं खरेदी, पाहा संपूर्ण संघ

Mumbai Indians Full Squad For IPL 2026 : आयपीएल २०२६ चा मिनी ऑक्शन मंगळवारी पार पडला आहे, या लिलावात मुंबई इंडियन्स (MI) संघाने सर्वात कमी ‘पर्स’ (खर्चाची मर्यादा) घेऊनही अत्यंत चाणाक्षपणे खेळाडूंची खरेदी केली. रिटेन्शननंतरच मुंबईचा संघ मजबूत दिसत होता, पण लिलावात त्यांनी कमी किमतीत महत्त्वाचे खेळाडू आपल्या ताफ्यात सामील केले, ज्यामुळे त्यांची ताकद आणखी वाढली आहे.
कमी पर्समध्ये प्रभावी खरेदी –
मुंबई इंडियन्सचा संघ या लिलावात केवळ २.७५ कोटी रुपये इतक्या कमी ‘पर्स’सह उतरला होता. त्यांना केवळ ५ खेळाडूंच्या जागा भरायच्या होत्या, ज्यात एक स्लॉट विदेशी खेळाडूसाठी राखीव होता. मुंबईने या संधीचा फायदा घेत प्रभावी विदेशी खेळाडू खरेदी केला.मुंबई इंडियन्सने १ कोटी रुपयांच्या किमतीला दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डीकॉक याला संघात पुन्हा सामील केले, जो त्यांच्यासाठी एक मोठा फायदा आहे. डीकॉकसोबतच, मुंबईने चार युवा भारतीय खेळाडूंना त्यांच्या मूळ किमतीत विकत घेतले.
QdK buyback ✅
Smart base-price picks ✅
Planning the MI way ✅Team Owner Akash Ambani breaks down the auction strategy 👇https://t.co/mhMjDa6Zfo
— Mumbai Indians (@mipaltan) December 16, 2025
- दानिश मलेवार (उजव्या हाताचा फलंदाज) – ३० लाख रुपये
- मोहम्मद इझहर (डावखुरा वेगवान गोलंदाज) – ३० लाख रुपये
- अथर्व अंकोलेकर (अष्टपैलू) – ३० लाख रुपये
- मयंक रावत (अष्टपैलू) – ३० लाख रुपये
हेही वाचा – KKR Squad IPL 2026 : केकेआरची धमाकेदार खरेदी! ग्रीन-पथिरानावर ४३ कोटी उधळले, पाहा संपूर्ण संघ
लिलावानंतर असा आहे मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ :
- फलंदाज/यष्टिरक्षक: रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, नमन धीर, शेरफन रूदरफोर्ड (ट्रेड), क्विंटन डीकॉक, दानिश मलेवार.
- अष्टपैलू: हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर (ट्रेड), विल जॅक्स, मिचेल सँटनर, कार्बिन बॉश, राज अंगद बावा, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत.
- गोलंदाज: जसप्रीत बुमराह, दीपक चहर, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे (ट्रेड), अल्लाह गजनफर, अश्वनी कुमार, रघु शर्मा, मोहम्मद इझहर.
हेही वाचा – Prashant Veer : कोण आहे प्रशांत वीर? ज्याला सीएसकेने विक्रमी बोली लावत बनवलं रातोरात करोडपती!
आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी –
आयपीएल २०२५ मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी चांगली झाली होती. लीग फेरीत मुंबईने १४ पैकी ८ सामने जिंकले, तर ६ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. संघ चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफमध्ये पोहोचला. मात्र, क्वालिफायर-२ मध्ये त्यांना पंजाब किंग्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. ज्यामुळे त्यांचे सहावे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये असे एकूण पाच विजेतेपद पटकावले आहेत.





