Shah Rukh Khan Health Update | बॉलीवूडचा किंग अर्थात शाहरुख खानबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएल सामन्यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सला सपोर्ट करण्यासाठी तो अहमदाबादला गेला होता. तेथे उष्णतेमुळे त्याची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थामुळे शाहरुखला उपचारासाठी अमेरिकेत जावे लागणार आहे. शाहरुख खान 29 जून रोजी मुंबईच्या रुग्णालयात गेला होता, मात्र काही कारणास्तव त्याच्या डोळ्यांवर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे आता त्याच्यावर अमेरिकेत उपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता शाहरुख खान आज अमेरिकेला रवाना होऊ शकतो. मात्र त्याच्या डोळ्याला नेमके काय झाले आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Shah Rukh Khan Health Update | शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच लेक सुहाना सोबत ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी तो ‘डंकी’ सिनेमात पाहायला मिळाला. याशिवाय त्याचा जवान आणि पठाण हे सलग तिन्हीही चित्रपट सुपरहिट ठरले होते. Shah Rukh Khan Health Update | हेही वाचा: नवाब मलिक यांना ‘सर्वोच्च’ दिलासा ; मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशापर्यंत अंतरिम जामीन कायम