Sharad Pawar : क्रिकेट इतिहासाचा अनमोल खजिना! वानखेडे स्टेडियमवर उभारलं ‘शरद पवार क्रिकेट संग्रहालय’, पाहा VIDEO

Sharad Pawar Cricket Museum : मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने वानखेडे स्टेडियम येथे ‘शरद पवार क्रिकेट संग्रहालया’चे उद्घाटन केले. या ऐतिहासिक क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर आणि महाराष्ट्राचे मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर शरद पवार आणि सुनील गावस्कर यांच्या जीवनाव्यापी पुतळ्यांचे अनावरणही करण्यात आले.
मुंबई क्रिकेटच्या समृद्ध वारशाचे प्रतीक –
हे संग्रहालय मुंबई क्रिकेटच्या समृद्ध वारशाचे प्रतीक आहे. यामध्ये मुंबईच्या क्रिकेटपटूंनी दान केलेल्या दुर्मीळ वस्तू, आयकॉनिक जर्सी, बॅट्स आणि खेळाडूंच्या ड्रेसिंग रूमची प्रतिकृती प्रदर्शित केली जाणार आहे. तसेच, ऑडिओ-व्हिज्युअल विभागात मुंबई क्रिकेटच्या अविस्मरणीय क्षणांना उजाळा देणारी दृश्ये पाहायला मिळतील. MCA अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले की, “हे संग्रहालय शरद पवार यांच्या दूरदृष्टीचे आणि सुनील गावस्कर यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे. हे तरुण खेळाडूंना प्रेरणा देईल.”
SUNIL GAVASKAR STATUE AT SHARAD PAWAR CRICKET MUSEUM IN WANKHEDE.
🐐
– Great work by MCA to celebrate the career of Legendary Sunil Gavaskar.🫡#SunilGavaskar #cricket #SharadPawar #mumbai #wankhede #museum #ipl #icc #bcci #gill #IndianCricket pic.twitter.com/xAVwA1v2F8— Vishwajit Thakur (@ThakurVish80259) August 23, 2025
At Wankhede, the MCA inaugurated the Sharad Pawar Cricket Museum 🎉
Statues of Sunil Gavaskar & Sharad Pawar unveiled, with Gavaskar addressing the ceremony. #SunilGavaskar #SharadPawar #Mumbaipic.twitter.com/kpsWXtEXHR— lightningspeed (@lightningspeedk) August 23, 2025
शरद पवार यांनी २००५ ते २००८ या कालावधीत बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई क्रिकेटला नवे आयाम मिळाले. संग्रहालयातील गावस्कर यांचा पुतळा त्यांच्या उत्कृष्टतेचे प्रतीक आहे, तर पवार यांचा पुतळा त्यांच्या क्रिकेटमधील योगदानाला मानवंदना देतो.
हेही वाचा – Asia Cup 2025 : ‘मला वाटत नाही की तो सर्व सामने खेळेल…’, जसप्रीत बुमराहबद्दल एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
या कार्यक्रमाला मुंबई इंडियन्सचे खेळाडू, माजी कर्णधार रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वानखेडे स्टेडियमवरील रोहित शर्मा, अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावाने स्टँड्सही यापूर्वी समर्पित करण्यात आले आहेत. हे संग्रहालय क्रिकेटप्रेमींसाठी एक अनमोल खजिना ठरणार आहे. वानखेडेच्या भूमीत ८ हजार चौरस फुटात उभारलेलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं संग्रहालय येत्या २२ सप्टेंबरला घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर सर्वसामन्यांसाठी खुलं होणार आहे.





