CNG Price Hike : मुंबईकरांना महागाईचा डबल झटका! १५ दिवसांत दुसऱ्यांदा सीएनजी-पीएनजी महागला; जाणून घ्या नवीन दर
CNG Price Hike : महानगर गॅस लिमिटेड ने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या दरांमध्ये वाढ जाहीर केली

CNG Price Hike : मुंबई आणि आसपासच्या परिसरात महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी ₹2 प्रति किलोने महाग केला आहे. यासोबतच घरगुती पाईप नॅचरल गॅस (पीएनजी) चे दरही 50 पैसे प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटरने वाढवण्यात आले आहेत. ही नवीन शुक्रवारीच्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. (CNG Price Hike)
15 दिवसांत इंधनाच्या दरात ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी 13-14 मे रोजीही गॅसच्या किमतीत 2 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रांमध्ये सीएनजीची किंमत ₹84 प्रति किलोवरून वाढून ₹86 प्रति किलो झाली आहे. तर, घरगुती पीएनजीची किंमत आता ₹52 प्रति एससीएम झाली आहे. (CNG Price Hike)
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, घरगुती गॅसच्या वाटपात घट झाली आहे. यामुळे कंपनीला अधिक खर्चिक बाह्य स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. यासोबतच, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीमुळे एकूण खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. (CNG Price Hike)
हेही वाचा
CNG Price Hike: पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सीएनजीच्या दरात वाढ ; ११ दिवसामध्ये चौथ्यांदा वाढ





