Ramkund Drowning : नाशिकच्या रामकुंडात दुर्दैवी घटना! पवित्र स्नान करताना ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
Ramkund Drowning : नाशिक येथील पवित्र गोदावरी नदी पात्रातील रामकुंडात शनिवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली.

Ramkund Drowning : नाशिक येथे गोदावरी नदी पात्रातील रामकुंडमध्ये शनिवारी सकाळी कुटुंबासोबत पवित्र स्नान करत असताना मुंबईतील एका ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. मृत मुलाची ओळख गोपाळ उमेश गुप्ता अशी पटली असून, तो मुंबईतील घाटकोपर (पूर्व) भागात राहत होता. (Ramkund Drowning)
गोपाळचे कुटुंब आणि इतर काही लोक तीर्थयात्रेसाठी नाशिकला आले होते. रामकुंडाला भेट दिली असता, त्यातील काही जणांनी सकाळी ८ च्या सुमारास तिथे पवित्र स्नान करण्यास सुरुवात केली. (Ramkund Drowning)
त्यापैकी चौघे जण रामकुंडात स्नान करत होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने गोपाळ पाण्यात बुडाला. जीवरक्षकांनी त्याला वाचवले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Ramkund Drowning)





