Mumbai Bomb Threat : मुंबईत खळबळ..! महापौर कार्यालयासह अमिताभ बच्चन यांचा बंगला उडवण्याची धमकी
Mumbai Bomb Threat : मुंबईच्या महापौर कार्यालयाला एका संशयित ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Mumbai Bomb Threat : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांची यंत्रणा सतर्क असतानाच आता मुंबईच्या महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Bomb Threat)
या ई-मेलमध्ये मुंबईतील विविध ठिकाणांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. महापौर कार्यालयासह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील जलसा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि दिलजीत दोसांज यांच्या कॉन्सर्टचाही ई-मेलमध्ये उल्लेख असल्याची माहिती आहे. या धमकीमुळे मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. (Mumbai Bomb Threat)
मुंबईच्या महापौर कार्यालयाला प्राप्त झालेल्या ई-मेलमध्ये 31 ऑक्टोबर आणि 27 नोव्हेंबर या तारखांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. 31 ऑक्टोबर रोजी शाळेवर ग्रेनेड हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. (Mumbai Bomb Threat)
तर 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे. या धमकीची दखल सुरक्षा यंत्रणांकडून गांभीर्यान घेतली असून ई-मेलमधील दाव्यांची सत्यता, त्यामागील हेतू आणि संभाव्य धोका यांची पडताळणी केली जात आहे. (Mumbai Bomb Threat)



