बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बॉम्बस्फोटाची धमकी ; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल, गुन्हा दाखल

Bombay Stock Exchange Bomb Threat । बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर बॉम्ब स्कॉडने संपूर्ण इमारतीची झडती घेतली आहे. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत उडवून देण्याची धमकी एका मेलद्वारे देण्यात आली होती.
हा मेल कॉम्रेड पिनारायी विजयन यांच्या आयडीवरून पाठवण्यात आला आहे. स्फोटक आरडीएक्स ठेवण्यात आले होते, जे दुपारी ३ वाजता स्फोट होणार होते असा दावा करण्यात आला आहे. मात्र, पोलिस पथक आणि बॉम्ब स्कॉड घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कसून शोध घेतला. Bombay Stock Exchange Bomb Threat ।
#BREAKING: The Bombay Stock Exchange received a bomb threat via email from an ID named “Comrade Pinarayi Vijayan,” claiming RDX IEDs were planted to explode at 3 PM. Bomb squad and police searched the premises but found nothing suspicious. An FIR has been filed at MRA Marg Police… pic.twitter.com/MEjjtrFewN
— IANS (@ians_india) July 15, 2025
परंतु, तपासादरम्यान त्यांना काहीही सापडले नाही. यानंतर, एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात बीएनएसच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशियातील सर्वात जुने एक्सचेंज आहे. हे असे मार्केट आहे जिथे कंपन्या म्युच्युअल फंड, शेअर्स, बाँड्स आणि डेरिव्हेटिव्ह्जमध्ये व्यापार करतात. Bombay Stock Exchange Bomb Threat ।





