IND vs AUS : ‘…फेअरवेल मॅच होती, एक फोटो तरी टाक’, चाहत्यांच्यासमोरच रोहितला काय म्हणाला गंभीर , पाहा VIDEO

Rohit Sharma Farewell Match Rumor Video Viral : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा तीन विकेटने पराभव करत मालिका खिशात घातली. भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा (73), श्रेयस अय्यर (61) आणि अक्षर पटेल (44) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर 50 षटकांत 9 बाद 264 धावांचा आव्हानात्मक स्कोर उभा केला. मात्र, ऑस्ट्रेलियाने नियमित अंतराने विकेट गमावूनही 46.2 षटकांत 8 बाद 265 धावा करत सामना आणि मालिका जिंकली. या सामन्यानंतर गौतम गंभीर आणि रोहितचा एक व्हिडीओ चर्चेत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.
रोहित-गंभीरचा व्हिडीओ व्हायरल –
दुसऱ्या वनडे सामन्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा एक विनोदी टिप्पणी असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संघ हॉटेलकडे परतत असताना गंभीर यांनी रोहितला उद्देशून मस्करीत म्हटले, “रोहित, सगळ्यांना वाटलं की आज तुझी फेअरवेल मॅच होती, एक फोटो तरी टाक!” यावर रोहित आणि कर्णधार शुबमन गिल यांना हसू आवरेना. हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांमध्ये रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले.
View this post on Instagram
रोहितने टीकाकारांना दिले सडेतोड उत्तर –
अलीकडेच रोहित शर्माला वनडे कर्णधारपदावरून हटवून शुबमन गिल यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. यानंतर सोशल मीडियावर रोहितच्या 2027 विश्वचषकातील सहभाग आणि त्याच्या वनडे कारकिर्दीच्या भवितव्याबाबत सतत अटकळी बांधल्या जात आहेत. पर्थमधील पहिल्या वनडेत अपयशी ठरल्यानंतर, अॅडलेडमधील 73 धावांच्या लढवय्या खेळीने रोहितने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आणि आपल्यात अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक असल्याचे सिद्ध केले.
हेही वाचा – Womens World Cup 2025 : भारताची सेमीफायनलमध्ये धडक! आता ‘या’ बलाढ्य संघांशी होणार टक्कर
भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात चांगली झुंज दिली, परंतु कमी धावसंख्येमुळे ऑस्ट्रेलियाला रोखण्यात अपयश आले. रोहित शर्माने श्रेयस अय्यरसोबत शतकीय भागीदारी करत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. मात्र, स्टार फलंदाज विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाल्याने त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – Team India : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात अन् BCCIची सर्वोच्च न्यायालयात याचिका; नेमकं प्रकरण काय?
या सामन्यात भारताने चांगला प्रयत्न केला, परंतु ऑस्ट्रेलियाच्या धावांचा यशस्वीपणे पाठलाग आणि मालिका विजयाने चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. आता सर्वांचे लक्ष तिसऱ्या वनडेकडे लागले आहे, जिथे भारत मालिकेतील सन्मान वाचवण्यासाठी खेळेल.





