Newasa News : आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या मागणीला यश; पालकमंत्री विखे पाटलांच्या आदेशानंतर मुळातून पाणी सोडले
यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ रिमझिम पाऊस पडत असल्याने ऐन खरीप हंगामात (Newasa News) शेती पिकांच्या वाढीच्या अत्यंत नाजूक टप्प्यावर पाण्याचा मोठा तुटवडा जाणवू लागला होता.

Newasa News : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ रिमझिम पाऊस पडत असल्याने ऐन खरीप हंगामात (Newasa News) शेती पिकांच्या वाढीच्या अत्यंत नाजूक टप्प्यावर पाण्याचा मोठा तुटवडा जाणवू लागला होता. सोयाबीन, कपाशी आणि मका यांसारखी महत्त्वाची पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला होता.
शेतकऱ्यांची ही गंभीर अडचण आणि पाण्याची नितांत गरज ओळखून नेवाशाचे (Newasa News) आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे धाव घेतली आणि मुळा धरणातून तातडीने आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी केली.
शेतकऱ्यांचा प्रश्न ऐकताच पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रशासनाला कसलाही विलंब न लावता तत्काळ कामाला लावले. त्यांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना धरणातून पाण्याचे आवर्तन त्वरित सोडण्याचे थेट आदेश दिले.
त्यानुसार आज शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी मुळा धरणातून (Newasa News) शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या “शेतकऱ्यांना पाण्यासाठी कधीही आंदोलन करावे लागणार नाही आणि पाण्याचे आवर्तन कमी पडू दिले जाणार नाही” या शब्दाची पालकमंत्र्यांनी तंतोतंत पूर्तता केली आहे.
भर पावसाळ्यात धरणातून वेळेवर पाणी सुटल्यामुळे तालुक्यातील सोयाबीन, कपाशी व मका पिकांना मोठे संजीवनी रूप मिळाले असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
ऐन अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी (Newasa News) ठामपणे उभे राहिल्याबद्दल तेलकुडगावचे सरपंच सतीश काळे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांचे आभार मानत त्यांच्या कार्यपद्धतीचे तोंडभरून कौतुक केले आहे.






