Mukesh Khanna : “‘जन गण मन’ हटवून, ‘वंदे मातरम्’चा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार करावा”; मुकेश खन्ना यांची मागणी
Mukesh Khanna : मुकेश खन्ना यांच्या विधानावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता

Mukesh Khanna : ‘शक्तिमान’ फेम ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांना नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. आपल्या देशाचं राष्ट्रगीत असलेले ‘जन गण मन’ हटवून त्याऐवजी, ‘वंदे मातरम्’चा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार करावा,अशी मागणी मुकेश खन्ना यांनी केली आहे.
एका मुलाखतीदरम्यान मुकेश खन्ना यांनी लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत सादर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात त्यांनी दावा केला की, ‘जन गण मन’ हे रवींद्रनाथ टागोर यांनी राणी एलिझाबेथच्या राजवटीत त्यांच्या सन्मानार्थ ते स्तुतिगीत लिहिलेलं आणि आपण ते केवळ स्वीकारलं. ते भारताचं खरं राष्ट्रगीत नाही. त्याऐवजी तो दर्जा ‘वंदे मातरम्’ला मिळायला हवा, जे लता मंगेशकर यांनी गायलेलं प्रसिद्ध गीत आहे.
‘जन गण मन’ शक्य तितक्या लवकर हटवून त्याऐवजी ‘वंदे मातरम’ आणलं पाहिजे. ‘वंदे मातरम’ हेच खऱ्या अर्थानं आपल्या मातीचे आणि राष्ट्रभावनेचं प्रतीक आहे.”
पुढे मुकेश खन्ना म्हणाले की, “भाग्यविधाता पंजाब सिंध’ यांसारखे शब्दप्रयोग, ते काही आपले नाहीत. लताजींनी गायलेलं ‘वंदे मातरम्’ हेच खऱ्या अर्थानं आपलं आहे. तीन वर्षांपूर्वी मी म्हटलेलं की ‘वंदे मातरम’ हेच राष्ट्रगीत असले पाहिजे. ”
Mumbai, Maharashtra: On the National Song Vande Mataram being rendered during the Independence Day celebrations at the Red Fort for the first time, Actor Mukesh Khanna says, “I had said this three years ago as well; Vande Mataram should be made the national song. Jana Gana Mana… pic.twitter.com/aGo7pmzVhF
— IANS (@ians_india) August 15, 2026
खन्ना यांनी सांगितलं की, त्यांनी दोन वर्षांपूर्वी ‘वंदे मातरम्’चं एक व्हर्जन रेकॉर्ड केलं होतं आणि ते लवकरच प्रदर्शित करण्याची त्यांची योजना आहे. ते म्हणाले की, “मी ‘वंदे मातरम्’चं सात मिनिटांचं एक असं व्हर्जन रेकॉर्ड केलं, जे निश्चितच अजरामर ठरेल. मी कल्याणजी-आनंदजी जोडीसोबत हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी पुढाकार घेतला, हे गाणं गेल्या दोन वर्षांपासून माझ्याकडे आहे. माझी अशी इच्छा आहे की, ‘जन गण मन’ हटवून त्याच्या जागी लवकरात लवकर ‘वंदे मातरम्’चा स्वीकार केला जावा.”
मुकेश खन्ना म्हणाले की, “मोदीजींनी या प्रक्रियेला गती दिलीय, आता प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ गायलं जाईल, आणि तेही केवळ तीन किंवा चार कडवी नव्हे, तर सर्व सातही कडवी गायली जाईल. ज्यात पूर्वी आक्षेपांमुळे वगळण्यात आलेल्या कडव्यांचाही समावेश असेल. ‘वंदे मातरम्’चं हे पुनरागमन पाहून मला आनंद होत आहे.”
हेही वाचा:






