MS Dhoni Statement : रोहित-विराट पुढचा वर्ल्ड कप खेळणार का? ‘कॅप्टन कूल’ धोनीने दिलं रोखठोक उत्तर; काय म्हणाला? पाहा VIDEO
MS Dhoni Statement : भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज स्तंभ रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबाबत क्रीडा विश्वात मोठी चर्चा सुरू आहे.

MS Dhoni statement on Rohit Virat about World Cup 2026 : भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज स्तंभ रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबाबत क्रीडा विश्वात मोठी चर्चा सुरू आहे. हे दोन्ही खेळाडू २०२७ चा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही, या प्रश्नावर आता भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मौन सोडले आहे. एका खाजगी कार्यक्रमात बोलताना धोनीने या जोडीची पाठराखण करत वयापेक्षा कामगिरीला महत्त्व देण्याचा सल्ला दिला आहे.
“वयाचा निकष कशासाठी?” – धोनीचा सवाल
कार्यक्रमात जेव्हा धोनीला रोहित आणि विराटच्या २०२७ मधील सहभागाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला, “त्यांनी पुढचा वर्ल्ड कप का खेळू नये? माझ्यासाठी वय हा कोणताही निकष नाही. कामगिरी आणि फिटनेस या दोनच गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. जर त्यांच्यात देशासाठी खेळण्याची जिद्द असेल आणि ते धावा करत असतील, तर ते नक्कीच संघात असतील.”
धोनीने पुढे स्पष्ट केले की, प्रत्येकाला समान वागणूक मिळायला हवी. जोपर्यंत खेळाडू चांगली कामगिरी करतोय, तोपर्यंत त्याला वयावरून जज करणे चुकीचे आहे. “तुम्हाला अनुभवी खेळाडू कसे मिळणार? जोपर्यंत तो सचिन तेंडुलकर नाही, तोपर्यंत तुम्ही २० वर्षांच्या खेळाडूकडून मोठ्या अपेक्षा करू शकत नाही,” असेही धोनीने यावेळी नमूद केले.
VIRAT & ROHIT FUTURE IN 2027 WORLD CUP (MS DHONI 🗣️)
Age shouldn’t be the criteria
Performance & fitness should be the matter
They have played enough cricket to decide what they have to do
Each and every player should be treated equallypic.twitter.com/1whGEwUTML
— SHAKTI 🌼 (@trueictfan_07) February 4, 2026
मैदानात अजूनही ‘विराट-रोहित’चीच हवा –
२०२७ चा एकदिवसीय विश्वचषक रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी खेळावा की नाही यावर एमएस धोनीने आपले मत मांडले.
निवृत्तीच्या चर्चा सुरू असतानाच या दोन्ही खेळाडूंनी बॅटने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ७४ धावा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने सलग दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावून आपला फॉर्म सिद्ध केला. विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने शतकी धमाका केला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहितने आपल्या फलंदाजीची धार कायम राखत २०२ धावा कुटल्या आहेत.
२०२७ च्या मिशनसाठी धोनीचा सल्ला –
दोन्ही खेळाडूंनी सध्या केवळ वनडे फॉरमॅटवर लक्ष केंद्रित केले आहे. धोनीच्या मते, खेळाडूंनी केवळ आपल्या कामगिरीवर लक्ष द्यावे. जर फिटनेस आणि फॉर्म कायम असेल, तर २०२७ च्या वर्ल्ड कपमध्ये ही जोडी भारतासाठी पुन्हा एकदा महत्त्वाची ठरेल, असे संकेत धोनीने दिले आहेत.





