MS Dhoni Practice : ‘थाला’ इज बॅक! IPL 2026 साठी सज्ज; रांचीच्या मैदानात सुरू केला सराव, पाहा VIDEO
MS Dhoni Practice : सीएसकेचा दिग्गज खेळाडू एमएस धोनीने आयपीएल २०२६ ची तयारी सुरु केली आहे.

MS Dhoni Practice starts for IPL 2026 in Ranchi : आयपीएल (IPL) २०२६ चा थरार मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. या मेगा स्पर्धेसाठी आता अवघे काही महिने शिल्लक असताना, चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सर्वात मोठा मॅचविनर आणि माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने मैदानावर पुनरागमन केले आहे. धोनीने आपल्या गावी म्हणजेच रांचीमध्ये आगामी हंगामासाठी जोरदार सराव सुरू केला आहे.
JSCA कडून व्हिडीओ शेअर; ‘रांचीचा अभिमान’ परतला
झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनने (JSCA) त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एमएस धोनीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात धोनी पॅड बांधून आणि बॅट घेऊन नेट्समध्ये उतरताना दिसत आहे. या व्हिडिओला “JSCA चा गौरव: महेंद्र सिंह धोनी” असे कॅप्शन देण्यात आले असून, तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावेळी धोनी झारखंडचा माजी क्रिकेटपटू सौरभ तिवारीशी चर्चा करतानाही दिसून आला.
झारखंड क्रिकेटमध्ये धोनीचा ‘मॅजिक’ मंत्र –
एमएस धोनीने आयपीएल २०२६ साठी कसली कंबर
धोनी केवळ स्वतःचा सराव करत नाहीये, तर तो झारखंडच्या युवा खेळाडूंनाही मार्गदर्शन करत आहे. नुकतेच झारखंडने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. या यशामागे धोनीच्या मोलाच्या सल्ल्याचा मोठा वाटा असल्याचे झारखंडचे कोषाध्यक्ष शाहबाज नदीम यांनी स्पष्ट केले.
गेल्या हंगामातील अपयश विसरून नव्या जोमाने तयारी –
View this post on Instagram
आयपीएल २०२५ चा हंगाम चेन्नई सुपर किंग्ससाठी विसरण्याजोगा ठरला होता. १४ सामन्यांत अवघ्या ४ विजयांसह संघ तळाच्या स्थानावर होता. ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत धोनीने कप्तानीची धुराही सांभाळली होती. धोनीने गेल्या हंगामात १३ डावात १९६ धावा केल्या होत्या. आता आयपीएल २०२६ मध्ये नवीन संघ आणि नवीन उत्साहासह धोनी मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.
आयपीएल 2026 साठी चेन्नई सुपर किंग्सचा पूर्ण संघ:
एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शिवम दुबे. कार्तिक शर्मा , प्रशांत वीर, राहुल चहर, अकील होसेन, मॅट हेन्री, सर्फराझ खान,अंशुल कंबोज, गुरजापनीत सिंह, जेमी ओव्हरटन, मुकेश चौधरी, नाथन एलिस, नूर अहमद, रामकृष्ण घोष, श्रेयस गोपाल, खलील अहमद, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, जॅक फॉल्क्स.





