MS Dhoni : नाद करा पण माहीचा कुठं…! बॉलिवूड अन् क्रिकेटच्या दोन्ही किंगना मागे टाकत रचला नवा इतिहास

तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या या कर्णधाराने आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला आहे. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्र सिंग धोनीने ब्रँड एंडोर्समेंटच्या क्षेत्रात इतिहास रचला आहे. TAM AdEx च्या जानेवारी ते जून या सहामाहीच्या अहवालानुसार, धोनीकडे सध्या एकूण 43 ब्रँड एंडोर्समेंट आहेत.
MS Dhoni has 43 Brand Endorsements – Highest for a celebrity in India in 2025. [TAM AdEx report]
– DHONI, FACE OF BRANDS…!!!! pic.twitter.com/ShigaFDhP5
— Johns. (@CricCrazyJohns) September 3, 2025
गेल्या वर्षी धोनीकडे 42 ब्रँड होते. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अभिनेता शाहरुख खान आहे, ज्याच्याकडे 35 ब्रँड आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर अभिनेता अमिताभ बच्चन आहे, ज्यांच्याकडे सध्या 28 ब्रँड आहेत. गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांच्याकडे 41 ब्रँड होते. क्रिकेटपटूंमध्ये धोनीनंतर विराट कोहली आणि राहुल द्रविड यांचा क्रमांक लागतो.
हेही वाचा – Asia Cup 2025 : भारताला आशिया कपमध्ये ‘या’ पठाण गँगपासून राहावे लागणार सावध, कधीही करु शकते मोठा उलटफेर
टीव्हीवर सर्वाधिक दिसणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये धोनी दुसऱ्या स्थानावर –
टीव्ही चॅनेलवर रोज सर्वाधिक दिसणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत महेंद्र सिंग धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनी सरासरी 22 तास प्रतिदिन टीव्हीवर दिसतो. पहिल्या क्रमांकावर शाहरुख खान आहे, जो सरासरी 27 तास प्रतिदिन टीव्हीवर दिसतो. जोडप्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग एकूण 23 ब्रँड्सचे एंडोर्समेंट करतात.
तसेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी तिसऱ्या क्रमांकावर आहे, जी 19 ब्रँड्सचे एंडोर्समेंट करते. दुसऱ्या क्रमांकावर अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना आहेत, जे एकूण 20 ब्रँड्सचे एंडोर्समेंट करतात. धोनीच्या या यशाने त्याची लोकप्रियता आणि ब्रँड व्हॅल्यू पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.





