MS Dhoni Injury : CSK च्या १६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘असं’! गुवाहाटीच्या मैदानात धोनीच्या चाहत्यांचा होणार हिरमोड
MS Dhoni Injury : महेंद्रसिंग धोनीच्या दुखापतीमुळे सीएसकेच्या एका सुवर्ण युगाचा दुवा निखळला आहे.

MS Dhoni Injury IPL 2026 CSK : चेन्नई सुपर किंग्स (CSK) च्या चाहत्यांसाठी आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. तब्बल १६ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नाही, ते यंदा पाहायला मिळणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या दुखापतीमुळे सीएसकेच्या एका सुवर्ण युगाचा दुवा निखळला आहे. MS Dhoni Injury
आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले असताना, चेन्नई सुपर किंग्सचा हुकुमी एक्का महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) दुखापतग्रस्त झाला आहे. पोटरीच्या (Calf Injury) दुखापतीमुळे धोनी किमान दोन आठवडे मैदानात उतरू शकणार नाही. ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या चेन्नईच्या पहिल्या सामन्यासह सुरुवातीचे किमान ३ सामने धोनीला मुकावे लागणार आहे.
१६ वर्षे आणि २५३ सामन्यांचा सिलसिला खंडित! MS Dhoni Injury
Official Statement
MS Dhoni is currently undergoing rehabilitation for a calf strain. As a result, he is likely to miss the first two weeks of TATA IPL 2026.
Get well soon, Thala! 💛🦁 pic.twitter.com/4dgmt5EWFi
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 28, 2026
धोनीच्या अनुपस्थितीमुळे चेन्नईच्या इतिहासात एक अभूतपूर्व बदल होणार आहे. गेल्या १६ हंगामात सीएसकेने एकूण २५३ सामने खेळले आहेत. या प्रत्येक सामन्यात धोनी किंवा सुरेश रैना या दोघांपैकी किमान एक खेळाडू तरी मैदानात उपस्थित असायचाच. २०२१ पर्यंत रैना संघाचा भाग होता आणि ज्या सामन्यात धोनी नसायचा, तिथे रैना नेतृत्व करायचा. मात्र, यंदा राजस्थानविरुद्धच्या सामन्यात १६ वर्षांत पहिल्यांदाच असे घडेल की, चेन्नईच्या प्लेइंग-११ मध्ये धोनी आणि रैना यांपैकी एकही दिग्गज नसेल.
चाहत्यांची प्रतीक्षा वाढली – MS Dhoni Injury
धोनी पुन्हा मैदानात दिसेल का? या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे मिळाले होते, मात्र दुखापतीने चाहत्यांच्या आनंदावर विरजण घातले आहे. पाचवेळा चॅम्पियन राहिलेल्या या संघासाठी हा बदल एका नव्या पर्वाची नांदी मानला जात आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली आता युवा ब्रिगेडला या दोन दिग्गजांशिवाय मैदानात लढावे लागणार आहे. धोनीच्या रिकव्हरीवर मेडिकल टीमचे बारीक लक्ष असून, तो एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संघात परतण्याची शक्यता आहे.





