MS Dhoni Retirement : ‘फिटनेस खालावतोय पण मी….!’ निवृत्तीच्या प्रश्नावरील धोनीच्या उत्तराने जिंकली चाहत्यांचनी मनं, पाहा VIDEO
MS Dhoni Retirement : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) गोटातून सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे

MS Dhoni Retirement Hints IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने आयोजित केलेल्या ‘प्री-सीझन’ इव्हेंटमध्ये महेंद्र सिंग धोनी केंद्रस्थानी राहिला. ४४ वर्षांच्या धोनीला जेव्हा निवृत्तीबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने दिलेले उत्तर ऐकून संपूर्ण चेपॉक स्टेडियम शांत झाले. धोनी म्हणाला, “माझा फिटनेसचा स्तर आता हळूहळू खालावत चालला आहे, पण तरीही मी प्रयत्न करत राहीन.”
चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी, धोनीचे सूचक उत्तर MS Dhoni Retirement
या कार्यक्रमाला दाक्षिणात्य अभिनेता सिवाकार्तिकेयन उपस्थित होता. त्याने धोनीला विचारले की, “तुम्ही ६० वर्षांचे होईपर्यंत खेळू शकता का?” यावर हसून उत्तर देताना धोनीने वाढत्या वयाचा आणि फिटनेसचा संदर्भ दिला. त्याने स्पष्टपणे ‘निवृत्ती’ हा शब्द वापरला नसला तरी, शरीर साथ देईपर्यंतच तो मैदानात दिसेल, असे संकेत त्याने दिले आहेत. माहीला मंचावर पाहताच अनेक चाहते भावूक झाले होते, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Wait for it.. #WhistlePodu #Roar26 pic.twitter.com/CjBX6sCEis
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 22, 2026
रैना आणि हेडनचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश – MS Dhoni Retirement
या ऐतिहासिक सोहळ्यात चेन्नई सुपर किंग्सने आपला ‘चिन्ना थाला’ म्हणजेच सुरेश रैना आणि दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडन यांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला. या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवणारे हे पहिले दोन खेळाडू ठरले आहेत. धोनीच्या उपस्थितीत या दोन्ही खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
३० मार्चला राजस्थानशी भिडणार –
चेन्नई सुपर किंग्स आपल्या आयपीएल २०२६ मोहिमेची सुरुवात ३० मार्च रोजी गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध करणार आहे. धोनी या हंगामात पूर्णवेळ खेळणार की ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून दिसणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





