RCB vs CSK : ‘वहां किसी को फील्डिंग करते देखा है…’, महागडा ठरलेल्या खलीलवर संतापला धोनी, पाहा VIDEO

MS Dhoni slam Khaleel Ahamed in RCB vs CSK match : आयपीएल २०२५ मधील आरसीबी विरुद्ध सीएसके यांच्यातील सामना ३ मे रोजी खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात आरसीबीने शेवटच्या चेंडूवर सीएसकेचा २ धावांनी पराभव केला. दरम्यान या सामन्यात जेव्हा सीएसके संघ क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा एमएस धोनी या सामन्यात महागडा ठरलेल्या खलील अहमदवर संतापलेला दिसला, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
धोनी खलीलवर का संतापला –
आरसीबीच्या डावातील १३ व्या षटकात एमएस धोनी वेगवान गोलंदाज खलील अहमदवर संतापलेला दिसला. खरंतर खलीलच्या चुकीच्या फिल्डिंग पोझिशनमुळे धोनी रागावला. यादरम्यान कॅप्टन कूलने खलीलला म्हणाला की, ‘वहां किसी को फील्डिंग करते देखा है’. (तिथे कोणाला क्षेत्ररक्षण करताना पाहिले आहे).या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— The Game Changer (@TheGame_26) May 4, 2025
धोनीने खलील अहमदला झापलं –
खलील अहमदच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे, तर त्याने आरसीबीविरुद्ध खूपच निराशाजनक कामगिरी केली. सीएसकेकडून १९ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या खलीलने ३३ धावा दिल्या. अशाप्रकारे, तो सीएसकेकडून एका षटकात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज बनला. खलीलच्या या षटकात रोमारियो शेफर्डने ४ षटकार आणि २ चौकार मारले. या षटकात, त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे, रोमारियो शेफर्डने १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. जो या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
हेही वाचा – KKR vs RR : रियान परागने रचला इतिहास! सलग ६ षटकार मारणार ठरला पहिलाच खेळाडू, पाहा VIDEO
३ षटकांत दिल्या तब्बल ६५ धावा –
खलील अहमदने त्याच्या ३ षटकांच्या स्पेलमध्ये खूप धावा खर्च केल्या. त्याने ३ षटकांत तब्बल ६५ धावा दिल्या आणि विशेष म्हणजे त्याला एकही विकेट्स घेता आली नाही. या हंगामात याआधीच्या प्रत्येक सामन्यात त्याने सीएसकेसाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने जवळजवळ प्रत्येक सामन्यात पॉवर प्लेमध्ये सीएसकेला विकेट्स मिळवून दिल्या आहेत. म्हणूनच प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही खलीलचे कौतुकही केले होते. मात्र, तो आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तो संघासाठी चांगलाच महागडा ठरला.





