KKR vs RR : रियान परागने रचला इतिहास! सलग ६ षटकार मारणार ठरला पहिलाच खेळाडू, पाहा VIDEO

Riyan Parag 6 sixes in row against KKR video viral in IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या ५३ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर एका धावेनी निसटता विजय मिळवला. मात्र, या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने इतिहास रचला. रियान पराग हा आयपीएलच्या इतिहासात सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने मोईन अलीच्या शेवटच्या पाच चेंडूंवर पाच षटकार आणि वरुण चक्रवर्तीच्या दुसऱ्या चेंडूवर एक षटकार मारले. अशाप्रकारे त्याने सलग ६ चेंडूंवर ६ षटकार मारले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रियान परागने केला कहर –
राजस्थानच्या डावातील १३ व्या षटकातील शेवटच्या पाच चेंडूंवर रियान परागने पाच षटकार मारले. त्यानंतर, १४ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून, तो सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणारा आयपीएलमधील पहिला फलंदाज बनला. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने आयपीएलमध्ये सलग ६ चेंडूत ६ षटकार मारलेले नाहीत. पण आता रियान परागने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याचबरोबर एकाच षटकात पाच षटकार मारणारा पाचवा खेळाडू ठरला आहे.
𝙍𝙖𝙢𝙥𝙖𝙣𝙩 𝙍𝙞𝙮𝙖𝙣 🔥
The #RR captain is in the mood tonight 😎
He keeps @rajasthanroyals in the game 🩷
Updates ▶ https://t.co/wg00ni9CQE#TATAIPL | #KKRvRR | @rajasthanroyals | @ParagRiyan pic.twitter.com/zwGdrP3yMB
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
परागने ६ चेंडूत मारले सलग ६ षटकार –
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या १३ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूपासून रियान परागने खेळायला सुरुवात केली. स्क्वेअर लेगवर दुसऱ्या चेंडूवर रियान परागने षटकार मारला. त्यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवर लाँग ऑनवर षटकार मारला. चौथ्या चेंडूवर स्क्वेअर लेगवर षटकार मारला. लाँग ऑनवर पाचव्या चेंडूवर पुन्हा षटकार मारला. यानंतर, त्याने सहाव्या चेंडूवर लाँग ऑफवर षटकार मारला. परागने मोईनच्या पाच चेंडूत पाच षटकार मारले. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने १४ वे षटक टाकले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, रियान पराग स्ट्राईकवर आला आणि त्याने चेंडू रिव्हर्स स्वीप करून सीमारेषेपलीकडे पाठवला. अशाप्रकारे, रियान पराग हा आयपीएलमध्ये सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणारा पहिला खेळाडू बनला आहे.
हेही वाचा – KKR vs RR : रोमांचक सामन्यात कोलकात्याचा राजस्थानवर निसटता विजय, रियान परागचे हुकले शतक
एका षटकात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज :
५ – ख्रिस गेल (आरसीबी) विरुद्ध राहुल शर्मा, २०१२
५ – राहुल तेवतिया (आरआर) विरुद्ध शेल्डन कॉटरेल (पीबीकेएस), २०२०
५ – रवींद्र जडेजा (सीएसके) विरुद्ध हर्षल पटेल (आरसीबी), २०२१
५ – रिंकू सिंग (केकेआर) विरुद्ध यश दयाल (जीटी), २०२३
५ – रियान पराग (आरआर) विरुद्ध मोईन अली (केकेआर), २०२५





