MS Dhoni Dinner : धोनीकडून विराटचा खास पाहुणचार! डिनरनंतर ‘माही’ने स्वतः कोहलीला हॉटेलवर सोडले, पाहा VIDEO

गुरुवारी (२७ नोव्हेंबर) महेंद्रसिंग धोनीने रांची येथील आपल्या घरी विराट कोहलीला जेवणाचे आमंत्रण दिले होते. गुरुवारी सायंकाळी कोहली धोनीच्या घरी पोहोचला. यावेळी ऋषभ पंत आणि धोनीसह तिथे डिनरचा आनंद घेतला. विशेष म्हणजे, डिनरनंतर धोनीने स्वतः कार चालवत कोहलीला टीम हॉटेलपर्यंत सोडले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
लंडनहून थेट वनडे मालिकेसाठी आगमन
Virat Kohli visited MS Dhoni’s home in Ranchi for dinner 🏡🍽️ and the two were later spotted travelling together in a car. King × Thala reunion hits different! ❤️🙌
🔗Follow https://t.co/0L4vAVgo2H#ViratKohli #MSDhoni #KohliDhoni #Ranchi #CricketLegends #Viral pic.twitter.com/Y5I1oMT2P7— Jeetwin Sports (@Jeetwin_Sports) November 28, 2025
विराट कोहली गेल्या वर्षापासून कुटुंबासोबत लंडनमध्ये स्थायिक झाला आहे. तो २५ नोव्हेंबर रोजी भारतात दाखल झाला आणि २६ नोव्हेंबर रोजी रांचीला पोहोचला. रांची विमानतळावर झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनचे सचिव सौरभ तिवारी आणि कोषाध्यक्ष शाहबाज नदीम यांनी त्याचे स्वागत केले.
हेही वाचा – SMAT 2025 : उर्विल पटेलचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत कहर! अवघ्या इतक्या चेंडूत ठोकले वादळी शतक
कोहलीने धोनीसोबत काही वेळ घालवल्यानंतर, आता त्याचे लक्ष आगामी वनडे मालिकेवर आहे. यापूर्वी, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभाग घेतला होता, जिथे भारतीय संघाला २-१ ने पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेत कोहलीला केवळ एक अर्धशतक झळकावता आले होते. त्यामुळे आता या आगामी वनडे मालिकेत शानदार प्रदर्शन करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोहलीचा दमदार विक्रम
MS DHONI AND VIRAT KOHLI TOGETHER IN THE SAME CAR. 😍❤️ pic.twitter.com/oGFirjPTo4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 27, 2025
वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रेकॉर्ड अत्यंत प्रभावी आहे. त्याने आतापर्यंत आफ्रिकेविरुद्ध ३१ वनडे सामन्यांमध्ये २९ डावांत फलंदाजी करताना ६५.३९ च्या सरासरीने १५०४ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा –WPL 2026 Auction चा महासंग्राम! यंदाच्या लिलावात टॉप-५ सर्वात महागडे खेळाडू कोण ठरले? जाणून घ्या
वनडे मालिकेचे वेळापत्रक –
तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ३० नोव्हेंबर रोजी रांची येथे, दुसरा वनडे ३ डिसेंबर रोजी रायपूर येथे आणि तिसरा वनडे ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाईल. दुखापतग्रस्त शुबमन गिलच्या जागी केएल राहुल भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत आहे.





