SMAT 2025 : उर्विल पटेलचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत कहर! अवघ्या इतक्या चेंडूत ठोकले वादळी शतक

तिसरे सर्वात जलद शतक –
उर्विल पटेलने ३१ चेंडूत १२ चौकार आणि १० षटकारांसह शतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना सर्व्हिसेसने नऊ बाद १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, गुजरातचे सलामीवीर उर्विल आणि आर्या देसाई यांनी सर्व्हिसेसच्या आक्रमणाचा नाश केला. त्यांनी १७४ धावांची सलामी भागीदारी केली आणि सामना एकतर्फी ठरला. उर्विलने ३७ चेंडूत ११९ धावांची धमाकेदार खेळी केली, तर आर्या देसाई ६० धावांवर बाद झाला.
Urvil Patel has scored 28-ball and 31-ball hundreds in T20s. 🤯💥
A rockstar in the shorter format.#UrvilPatel #CSK #SMAT pic.twitter.com/wqHW8PuZtr
— Sportskeeda (@Sportskeeda) November 27, 2025
ख्रिस गेलचाही मोडला रेकॉर्ड –
उर्विल पटेलने युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलचा विक्रमही मोडला आहे. गेलने ३० चेंडूत सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केला होता. तो अनेक दिवस यादीत अव्वल स्थानावर राहिला. पण २०२४ मध्ये उर्विलने वादळी खेळी करत २८ चेंडूत शतक ठोकले होते. त्या सामन्यात उर्विलने ३२२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि १२ षटकार मारले. उर्विलने ३५ चेंडूत ११२ धावा काढल्यानंतर नाबाद राहिला.
हेही वाचा – WPL 2026 Auction चा महासंग्राम! यंदाच्या लिलावात टॉप-५ सर्वात महागडे खेळाडू कोण ठरले? जाणून घ्या
उर्विल पटेल यंदा आयपीएल २०२६ मध्ये दिसू शकतो. तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. सीएसकेने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत परंतु उर्विलला सोडलेले नाही. जर त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली तर तो पुढील हंगामात दिसू शकतो.





