Big Breaking : बिग बींची प्रकृती पुन्हा खालावली, पोस्टने वाढवली चिंता…

मुंबई – सिनेसृष्टीचे महानायक अर्थातच अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ, ब्लॉग शेअर करत असतात. सोशल मीडियावर बिग बींची कोणतीही पोस्ट वेगाने व्हायरल होत असते. अशीच एक पोस्ट पुन्हा एकदा जोरदार व्हायरल झाली आहे.
नुकतंच, शनिवारी (दि. २७) रात्री लिहिलेल्या ब्लॉगमधून अमिताभ यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. शनिवारी अमिताभ यांनी केवळ एक ओळीचा ब्लॉग लिहिला. “मेडिकल कंडिशन…सर्जरी… आणखी जास्त मी लिहू शकत नाही, एबी…” असे त्यांनी लिहिले. त्यांचा हा ब्लॉग वाचताच, चाहते चिंतीत झालेत. मात्र, शस्त्रक्रिया झाली की, होणार हे अद्याप समजू शकले नाही. सध्या लोक सतत कमेंट करुन त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करत आहेत.
दरम्यान, यापूर्वी देखील अमिताभ यांना यकृताच्या त्रासामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपले यकृत केवळ 25 टक्केच कार्यरत असल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते. त्यांचे हे ट्विट देखील चांगलेच व्हायरल झाले होते.





