Pune District : खासदार, आमदार फंडातून विकासकामे मार्गी लावणार

चिंबळी : विविध विकास कामांना आमदार व खासदार फंड मंजूर करून प्राधान्य दिले जाईल, तसेच या परिसरात गोरगरीब जनतेसाठी विविध योजना राबविण्यासाठी पाहिजे ती मदत केली जाईल. असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी निघोजे येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
निघोजे (ता. खेड) येथे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी चांगल्या पद्धतीने बैठक व्यवस्था व्हावी म्हणून अल्ट्राट्रेक कंपनी यांच्या माध्यमातून व सीएसआर फंडातून बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन नूतन इमारतीचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार बाबाजी काळे, अल्ट्राटेक कंपनीचे समीर भोसले, यश भोसले, प्रमोद भोसले, विनायक शितोळे, दिनेश बागडे, दादासाहेब गोरे, राहुल बागले, वासुदेव शर्मा, अजय शिंदे, संग्राम पाटील, प्रतिक गोखले, अश्विनी हसबे, केंद्र प्रमुख हिरामण कुसाळकर, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक, कुरूळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, पोलीस पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक व कर्मचारी वर्ग तसेच आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगाव निघोजे ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असून येथील गायरान जमीन मिळाली तर विशेष निधीमधून शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय इमारत विकासित करता येईल.
-सुनिता येळवंडे, लोकनुक्त सरपंच
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब घाटे यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक कृष्णराज काटकर यांनी केले. हभप ज्ञानेश्वर नाणेकर यांनी आभार मानले.





