MP Election 2023 : भाजप नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वादंग म्हणाले,’हेमा मालिनींचा डान्स…’

BJP Narottam Mishra : भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा एका नव्या वादात सापडले आहे. दतिया येथील एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या नावाचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर त्यांच्यावर महिलांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला.
भाषणादरम्यान बोलताना मिश्रा यांनी हेमा मालिनी यांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले, “माझा दतिया अशा प्रकारे उडाला की सांस्कृतिक कार्यक्रमापासून ते हेमा मालिनीला डान्स करण्यापर्यंत.” नरोत्तम मिश्रा यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. मिश्रा यांच्या विधानाची तीव्र दखल घेत जनता दल (युनायटेड) चे पदाधिकारी ” त्यांच्याच पक्षाच्या खासदार हेमा मालिनीबद्दल बोलत आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठांनी ट्विटरवर ट्विट करत निशाणा साधला आहे ते म्हणाले,’भाजपच्या माननीय मंत्र्याचा महिलांबाबतचा खरा अर्थ सुसंस्कृत लोकांनीही ऐकावा. ते आपल्याच पक्षाच्या नेत्यालाही सोडत नाहीत.” असं म्हणत त्यांनी भाजवर टीका केली आहे.
मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होत आहे. अशात नरोत्तम मिश्रा चौथ्यांदा दतियामधून निवडणूक लढवत आहे. मिश्रा 2008, 2013 आणि 2018 च्या विधानसभा निवडणुकीत दतिया येथून विजयी झाले होते. काँग्रेसने या जागेवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र भारती यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला, मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.





