पंजाबात तीनशे युनिट वीज मोफत देण्याच्या हालचाली

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने पंजाबात निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार नागरीकांना प्रत्येकी तीनशे युनिट मोफत वीज देण्याच्या संबंधात हालचाली सुरू केल्या आहेत.
या संबंधात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीत आज आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केली. प्रत्येक घरात 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्याबरोबरच पंजाबातील बेरोजगारी कमी करणे आणि प्रत्येक महिलेला दरमहा 1,000 रुपयांची आर्थिक मदत करणे अशी आश्वासने आम आदमी पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती.
त्या आश्वासन पुर्तीसाठी मुख्यमंत्री मान हे आता प्रयत्नशील आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना राज्यात सुरळीत, तत्पर आणि त्रासमुक्त गहू खरेदी सुरू करण्याचेही आश्वासन दिले आहे.
बाजारात गहु विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, दिवे, शौचालय आदि नागरी सुविधाही शासकीय धान्य खरेदी केंद्रात दिल्या जाणार आहेत.





