पुणे – नागरिकांना पालिकेच्या निर्णय प्रक्रियेत स्थान देणाऱ्या क्षेत्र सभेच्या नियमित आयोजनाच्या मागणीसाठी मंगळवारी पुणे महापालिकेसमोर इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
ग्रुपचे सदस्य असलम इसाक बागवान, इब्राहिम खान,सचिन आल्हाट, राजू सय्यद, इम्रान घोडके, वीणा कदम, बदी उद्दमान खान, रियाझ बागवान आदी उपस्थित होते. 17 ऑगस्ट रोजी पुणे महापालिकेत होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या मागण्या मान्य करून निर्णय घेतला जावा, यासाठी हे आंदोलन केले. 26 जुलै रोजी धरणे आंदोलन व 6 ऑगस्ट रोजी केलेले स्मरण आंदोलनास प्रतिसाद न मिळाल्याने हे ठिय्या आंदोलन करण्यात आले.