Crime News: पाच वर्षीय पोटच्या चिमुकलीचा खून करणाऱ्या नराधम आईला जन्मठेप
Crime News : दंड न भरल्यास तिला अतिरिक्त ६ महिने कारावास भोगावा लागणार

पुणे – पोटच्या पाच वर्षीय चिमुकलीचा पोट व अंगावर चाकुने वार करून खून करणाऱ्या नराधम आईला जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. गांधी यांनी सुनावली. दंड न भरल्यास तिला अतिरिक्त ६ महिने कारावास भोगावा लागणार आहे.
मुलगी वैष्णवी हिचा खून प्रकरणी कल्पी महेश वाढेर (वय ४७, रा. हडपसर) हिला शिक्षा झाली आहे. हडपसर, काळेपडळ येथील दुर्वांकुर सोसायटी येथे २७ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील मकरंद औरंगाबादकर, सुनील हांडे यांनी काम पाहिले.
कल्पी सोसायटीच्या सी-१०६ फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती. अज्ञात कारणाने तिने मुलीचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावर सुनावणी करत न्यायालयाने शिक्षा सुनावली.
तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात यांनी या प्रकरणाचा तपास केला. पोलीस हवालदार संभाजी म्हांगरे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.
Ayesha Khan: हिरव्या साडीत आयशा खानचा मराठमोळा थाट; ठुशी-नथ अन् चंद्रकोरीने वेधलं सगळ्यांचं लक्ष!





