Kolkata News : आरजी कर बलात्कार प्रकरणातील पीडितेची आई रिंगणात; गुन्ह्याभोवतीचे राजकारण बंगालच्या निवडणुकीच्या रिंगणात
Kolkata News : सत्ताधारी तृणमूलने २०११ पासून मुख्य प्रतोद निर्मल घोष यांच्या माध्यमातून ही जागा आपल्या ताब्यात ठेवली होती.

Kolkata News : कोलकाता येथील सरकारी आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात एका तरुण डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि तिची हत्या यामुळे देशभरात संतापाची लाट उसळून २० महिने उलटले आहेत; आता त्या गुन्ह्याभोवतीचे राजकारण बंगालच्या निवडणुकीच्या रणांगणात येऊन पोहोचले आहे.
पाणीहाटी या मतदारसंघात या बलात्कार पिडीतेची आई रत्ना रंगनाथ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात तृणमूल काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार निर्मल घोष यांचे पुत्र, तीर्थंकर घोषउभे आहेत.
पाणीहाटी हा असा मतदारसंघ आहे, जिथे गेल्या जवळपास सहा दशकांपासून सत्तेची सूत्रे केवळ डावे पक्ष , काँग्रेस आणि त्यानंतर तृणमूल यांच्यातच फिरत राहिली आहेत.
अशा या मतदारसंघात, २९ एप्रिल रोजी होणारी लढत ही आता केवळ एक सामान्य निवडणूक राहिलेली नाही. आर.जी. कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यात कोण अपयशी ठरले, आणि आता तिला न्याय कोण मिळवून देऊ शकेल, या प्रश्नाभोवती ही निवडणूक केंद्रित असेल. Kolkata News
भाजपसाठी, रत्ना रंगनाथ यांना उमेदवारी देणे हा आरजी कर आंदोलनामुळे निर्माण झालेला संताप आणि अविश्वास, याचे रूपांतर तृणमूल-विरोधी मतांमध्ये करण्याचा एक प्रयत्न आहे.
सत्ताधारी तृणमूलने २०११ पासून मुख्य प्रतोद निर्मल घोष यांच्या माध्यमातून ही जागा आपल्या ताब्यात ठेवली होती. त्यामुळे आता तृणमूलचा संघटनात्मक बालेकिल्ला जनतेच्या संतापाच्या लाटेसमोर टिकून राहू शकतो की नाही, हे निकालादिवशी सिद्ध होईल.
‘भाजपच माझ्या मुलीला न्याय मिळवून देऊ शकतो’
आरजी कर पीडितेचे वडिल म्हणाले की, केवळ राजकीय बदलाद्वारेच न्याय मिळू शकेल, या निष्कर्षावर आमचे कुटुंब पोहोचले आहे. केवळ भाजपच माझ्या मुलीला न्याय मिळवून देऊ शकतो आणि राज्यातील महिलांना सुरक्षा व संरक्षण प्रदान करू शकतो. आम्ही म्हणालो होतो की, आमच्या मुलीच्या मृत्यूवर आम्ही राजकारण होऊ देणार नाही. पण डाव्या पक्षांनी केवळ आंदोलने करण्यापलीकडे दुसरे काय केले? Kolkata News
डाव्या पक्षांनी या निवडणुकीसाठी कलातन दासगुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. ते या आंदोलनातील एक ओळखीचे आणि प्रमुख चेहरे होते. राजकारणात कोणीही येऊ शकते. जर अशी घटना पुन्हा घडली, तर आम्ही पुन्हा एकदा रस्ते रोखू, रात्रभर ठिय्या मांडू आणि आंदोलन करू. आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. न्यायासाठीची ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढू,” असा विश्वास पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केला. Kolkata News
हेही वाचा :






