Naila Grrewal : ’12th Fail’ मध्ये मेधा शंकरच्या जागी ही अभिनेत्री दिसणार होती; अशी गमावली हातातली संधी, अभिनेत्रीने सांगितली आठवण
Naila Grrewal : अभिनेत्री नायला ग्रेवाल मामला लीगल है या वेबसिरीजमुळे चर्चेत असून, तिने '12th Fail' सिनेमाबद्दलचा एक खुलासा केला आहे.

Naila Grrewal : अभिनेत्री नायला ग्रेवाल ‘मामला लीगल है सीझन 2’ मुळे चर्चेत आहे. तिने या वेबसिरीजमध्ये वकील अनन्या श्रॉफच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
तिला या वेबसिरीजमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली असून, तिने अनेक सिनेमांमध्ये देखील दमदार भूमिका साकारल्या आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’मध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत नायला ग्रेवाल हिने स्क्रीन शेअर केली होती.
नुकतीच तिने मेड ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने सिनेमाच्या प्रवासाविषयी दिलखुलास गप्पा मारल्या. तर अभिनेता रणबीर कपूरसोबत काम केल्याचा अनुभव शेअर केला.
याशिवाय अभिनेत्री ’12th Fail’ सिनेमात झळकणार होती, पण असं काय घडलं ज्यामुळे तिच्या जागी या सिनेमात अभिनेत्री मेधा शंकरला कास्ट करण्यात आले. याचा खुलासा मुलाखतीत नायला ग्रेवाल हिने केला.
रणबीरसोबतचा अनुभव शेअर करताना म्हणाली….
“मला एका स्टारसारखे वाटले. रणबीर कपूर माझा आवडता होता आणि आजही आहे. त्याला माझ्यासमोर प्रत्यक्ष पाहणे ही एका स्टारला भेटल्यासारखी भावना होती आणि मी त्याच्याशी बोलू शकले ही एक अविश्वसनीय गोष्ट होती. जेव्हा तो अभिनय करतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांतून एक वेगळ्याच पातळीचा प्रामाणिकपणा दिसतो.”
’12th Fail’ या सिनेमात अभिनेत्री मेधा शंकरच्या जागी विक्रांत मेस्सीची सह-अभिनेत्रीची भूमिकेसाठी नायला ग्रेवालला विचारणा करण्यात आली होती. अभिनेत्रीच्या मते, त्या कास्टिंग कॉलला प्रतिसाद देण्यास नकार देणे तिला महागात पडले आणि हातातली भूमिका तिने गमावली.
यावर बोलताना अभिनेत्री म्हणाली, तो इतका चांगला सिनेमा होता. त्यामुळे कास्टिंग कॅालला प्रतिसाद न दिल्याबद्दल मी स्वतःला दोष दिला. मी त्यावेळी दुसरं काहीतरी करत होते आणि काही कारणास्तव ती संधी हातातून निसटून गेली. पण खरं तर, आता माझा नशिबावर खूप विश्वास आहे. ते कास्टिंग अगदी योग्य होतं.
नायला ग्रेवालच्या कामाबद्दल
अभिनेत्री नायला ग्रेवाल ‘इश्क विश्क रिबाउंड’, ‘थप्पड’ आणि ‘बरेली की बर्फी’ यांसारख्या सिनेमांमध्ये दिसली आहे. सध्या ती ‘मामला लीगल है 2’ मध्ये दिसत आहे, ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : Lawrence Bishnoi: कॅनडात पुन्हा गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी… “हे फक्त ट्रेलर!”





