Ankita Lokhande : आई आणि पतीचा वाढदिवस एकाच दिवशी; अंकिता लोखंडेने शेअर केली खास पोस्ट
Ankita Lokhande : अंकिताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर विकी जैनचा फोटो शेअर करत त्याच्यासाठी एक संदेश लिहिला.

Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त अंकिताने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत पतीवरचं प्रेम व्यक्त केलं आहे.
विशेष म्हणजे, विकी जैन आणि अंकिताची आई या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असल्याने अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील या दोन महत्त्वाच्या व्यक्तींना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
अंकिताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर विकी जैनचा फोटो शेअर करत त्याच्यासाठी एक संदेश लिहिला. या पोस्टमध्ये तिने विकीला तिच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती संबोधत, “तूच माझं सर्वस्व आहेस,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
त्याला निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा देतानाच त्याच्याबद्दलचे प्रेमही अंकिताने व्यक्त केले. अंकिताच्या या पोस्टवर चाहते आणि अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत विकी जैनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यासोबतच अंकिताने तिच्या आईसाठीही एक भावनिक पोस्ट शेअर केली. इन्स्टाग्राम स्टोरीवर आईसोबतचा फोटो पोस्ट करत तिने आपल्या आयुष्यातील आईचे स्थान शब्दांत मांडणे अशक्य असल्याचे म्हटले. “तू माझ्यासाठी जे काही केलं आहे, त्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही,” अशा शब्दांत तिने आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तिचा हा भावनिक संदेश चाहत्यांच्या मनाला स्पर्शून गेला.

अंकिताची पतीसाठी पोस्ट
दरम्यान, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा विवाह १४ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईत झाला. एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत सुरू झालेली त्यांची मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि काही वर्षांच्या नात्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर हे जोडपे ‘बिग बॉस १७’मध्येही झळकले होते. या शोमध्ये त्यांच्या नात्यातील गोडवा आणि मतभेद दोन्ही प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले होते.

अंकिताची आईसाठी पोस्ट
अलीकडेच अंकिता आणि विकी ‘लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाले होते. त्यांच्या धमाल केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.
Amit Thackeray Speech: “…मी परत येतो”; भरसभेत अमित ठाकरे भाषणच विसरले





