अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपुतच्या आठवणीत शेअर केली पोस्ट

Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडेने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या ‘पवित्र रिश्ता’ शोमधील एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ मूळतः बालाजी टेलिफिल्म्सने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर अंकिता लोखंडेने तो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि सुशांत नवरात्रीच्या एका स्पेशल एपिसोडमध्ये पारंपरिक पोशाखात दांडिया खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहतेही भावूक झाले आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, ‘पवित्र रिश्ता’मध्ये अंकिता आणि सुशांत यांनी अर्चना आणि मानव यांची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे अंकिता व सुशांत सिंह राजपूतमध्ये जवळीक वाढली होती. ते सात वर्षे एकत्र होते. त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चाही रंगल्या होत्या. परंतु, काही कारणांमुळे ते वेगळे झाले. त्यानंतर अंकिताने २०२१ मध्ये विकी जैनशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. Ankita Lokhande |
हेही वाचा :
Shirur News : अखेर पिंपरखेड येथील शेतरस्ता खुला; शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या समन्वयाने मार्ग सुकर





