Ankita Lokhande : अंकिता लोखंडे हिजाब घालण्यावरून ट्रोल; अबू धाबीमधील फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी सुनावले
Ankita Lokhande : गोसेवा केल्यानंतर कौतुकाचा वर्षाव अन् आता हिजाब परिधान केल्याने अंकिता ट्रोल

Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या पती विक्की जैनसोबत अबू धाबीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे आणि तिने तिथले अनेक फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. मात्र, हिजाब परिधान केल्यामुळे ती युजर्सच्या निशाण्यावर आली आहे.
काही दिवसांपूर्वीच अंकिता गोसेवा करताना पाहायला मिळाली. ज्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिचे खूप कौतुक केले होते. पण आता हिजाब घालण्यावरून आणि मशिदीत फोटो काढल्यामुळे तिच्या धार्मिक श्रद्धेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अंकिता लोखंडे पोस्ट
अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अबू धाबी व्हेकेशनचे फोटो शेअर करत लिहिले, ‘माझ्या कॅमेऱ्यातून थोडेसे अबू धाबीचे प्रेम एक्सप्लोर करत आहे, हसत आहे आणि आठवणी बनवत आहे.’ अंकिता आणि विक्कीने येथे ‘वंडर वुमन’पासून ते ‘वार्नर ब्रदर्स’च्या फन झोनसारख्या ठिकाणांना भेट दिली आणि फोटो काढले.
View this post on Instagram
युजर्स संतापले
परंतु, यावेळी अंकिता लोखंडेने जीन्स-टॉपवर हिजाब घातला आणि मशिदीत विक्की जैनसोबत फोटो काढले. यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले, ‘हिंदू नेहमी सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) असण्याबद्दल बोलतात, पण मुस्लिम कधीच असे करत नाहीत. आणतु तर मराठी मुलगी आहे, मग हिजाब का घातला?’ दुसऱ्याने कमेंट करत, ‘तुम्ही मुस्लिम आहात का?’ असा थेट सवाल केला आहे.
एकीकडे अंकितावर टीका होत असली तरी काहींना तिचा हा अंदाज आवडला आहे. काही जणांकडून तिचे कौतुकही केले जात आहे. दरम्यान, याआधी हिजाब परिधान केलेला अंकिताचा फोटो समोर आला होता, त्यावेळेलाही तिच्यावर टीका करण्यात आली होती.
हेही वाचा:
Devendra Fadnavis : शिंदेसेनेला धक्का! ‘मातोश्री’वरून मध्यरात्री फडणवीसांना फोन; नेमकं काय घडलं?





