Ankita lokhande husband Vicky jain : ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती आणि प्रसिद्ध व्यावसायिक विकी जैनवर गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर त्याने चाहत्यांना त्याच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स दिली. सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये त्याच्या हाताला पट्टी बांधलेली दिसत आहे. या पोस्टमध्ये विकीने सांगितलं की, ‘सर्जरी झाली आहे. आता ठीक होण्याची वेळ आहे आणि हे सुद्धा दाखवण्याची वेळ आली आहे की मी सतत अपघातांचा शिकार होणारा नाही.’ या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये रुग्णालयातली रुम पहायला मिळतेय. काही महिन्यांपूर्वीच विकीच्या हाताला मोठी दुखापत झाली होती आणि शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या हातावर तब्बल 45 टाके पडले होते. जवळपास आठवडाभर तो रुग्णालयात होता. Ankita lokhande husband vicky jain Ankita lokhande husband Vicky jain विकीच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्याच्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली आहे. या कठीण काळात अंकिता लोखंडे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. हॉस्पिटलमध्ये आणि घरी देखील ती पतीची पूर्ण काळजी घेत आहे. दरम्यान, विकी जैन हा मूळचा बिलासपूरचा असून तो मोठा व्यावसायिक आहे. अंकिता लोखंडेशी लग्न केल्यानंतर तो मनोरंजन सृष्टीत प्रसिद्ध झाला. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2021 मध्ये या दोघांनी धूमधडाक्यात लग्न केलं. अंकिता आणि विकीने ‘स्मार्ट जोडी’ आणि ‘बिग बॉस 17’ यांसारख्या शोजमध्ये भाग घेतला होता. Ankita lokhande husband vicky jain हेही वाचा: Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीबाबत संभ्रम? पात्रतेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका