Varun Chakaravarthy Reveals : “तू मरत का नाहीस?”आयपीएल २०२१ स्थगित झाल्याने वरुण चक्रवर्तीला मिळाल्या होत्या जीवे मारण्याच्या धमक्या
Varun Chakaravarthy Reveals : वरुण चक्रवर्ती याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात भयानक आणि वेदनादायी अनुभवाचा खुलासा केला आहे.

Varun Chakaravarthy Threats IPL 2021 Controversy : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने २०२१ मधील त्या काळ्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला आहे, जेव्हा संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत होती. साहिबा बालीच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना वरुणने सांगितले की, तो पॉझिटिव्ह आल्यामुळे आयपीएल स्थगित झाले आणि त्यानंतर चाहत्यांनी त्यालाच लक्ष्य केले होते. ज्याबद्दल त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
आयपीएल स्थगितीचा ‘विलेन’ ठरवला –
२०२१ मध्ये आयपीएलचे आयोजन बायो-बबलमध्ये करण्यात आले होते. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर कोरोनाच्या विळख्यात सापडले. यामुळे अहमदाबाद येथे होणारा केकेआर विरुद्ध आरसीबी सामना स्थगित करावा लागला आणि अखेर बीसीसीआयला संपूर्ण लीगच मध्येच थांबवावी लागली. “मी पहिला खेळाडू होतो जो पॉझिटिव्ह आला, त्यामुळे लोक प्रचंड संतापले होते. त्यावेळी मनोरंजनाचे एकमेव साधन आयपीएल होते आणि ते माझ्यामुळे बंद झाले, असे लोकांना वाटले,” असे वरुणने नमूद केले.
ट्रोलिंगचा अतीरेक आणि धमक्या –
🚨 VARUN CHAKARAVARTHY OPENS UP ON DEATH THREATS 🚨
– Varun Chakaravarthy says he received death threats and abusive calls after the 2021 T20 World Cup. No verified complaint detail has surfaced in the reports I found. [IndiaToday]#VarunChakaravarthy | #KKR | #IPL2026 |… pic.twitter.com/Np80h107k0
— Cricketik 24×7 (@cricketik247) March 22, 2026
वरुणने पुढे सांगितले की, “लोक मला सोशल मीडियावर घाणेरड्या शिव्या देत होते. ‘तू मरत का नाहीस?’ इथपर्यंत लोकांची मजल गेली होती. तसेच ते जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. ते दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता.” त्यावेळी वरुण खांद्याच्या दुखापतीच्या स्कॅनसाठी ग्रीन चॅनेलद्वारे बायो-बबलबाहेर गेला होता आणि तिथूनच त्याला संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले होते.
केकेआरनंतर इतर संघांतही पसरला संसर्ग
संसर्ग केवळ केकेआरपुरता मर्यादित राहिला नाही. चेन्नई सुपर किंग्सचे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि सीईओ काशी विश्वनाथन यांनाही कोरोनाची लागण झाली, ज्यामुळे लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावी लागली होती. वरुण चक्रवर्तीने आज या सर्व कटू आठवणींना पूर्णविराम देत, चाहत्यांनी खेळाडूंच्या मानसिक स्थितीचा विचार करावा, असे आवाहन केले आहे.





