Virat Kohli : किंग कोहली जपानकडून खेळणार? जपानी संघाच्या अधिकृत पोस्टमुळे चाहत्यांमध्ये गोंधळ, फोटो होतोय व्हायरल

Virat Kohli Photo Viral in Japan Pink Jersey : क्रिकेटचा ‘किंग’ म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली बराच काळ भारतीय निळ्या जर्सीमध्ये दिसला नव्हता. पण आता चाहत्यांचा प्रतीक्षेचा काळ संपणार आहे. कोहली १९ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरणार आहे. मात्र, त्यापूर्वी कोहलीचा पिंक जर्सीतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जपान क्रिकेट संघाने हा फोटो आपल्या अधिकृत खात्यावर पोस्ट केला, ज्यामुळे चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
जपान क्रिकेट संघाच्या पोस्टमुळे गोंधळ –
जपान क्रिकेट संघाने आपल्या पिंक जर्सीमध्ये विराट कोहलीचा फोटो शेअर करत लिहिले, ‘जर असे झाले तर?’ या फोटोमुळे चाहते चकीत झाले आणि काहींना वाटले की, कोहलीने निवृत्ती घेऊन जपानकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही केवळ अफवा आहे. कोहली १९ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाकडून खेळणार आहे. विशेष म्हणजे, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर कोहलीने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. याशिवाय, कोहलीने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे चाहत्यांनी या पोस्टवर सहज विश्वास ठेवला.
JAPAN CRICKET INSTAGRAM POST FOR VIRAT KOHLI. 🐐
– King Kohli, The Global Icon..!!!! pic.twitter.com/C7P0dsjuwV
— Tanuj (@ImTanujSingh) October 5, 2025
चाहत्यांची प्रतीक्षा संपणार –
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर विराट कोहली मैदानावर दिसला नव्हता. त्यामुळे १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहली सातत्याने धावा करत आहे, त्यामुळे चाहत्यांना त्याच्याकडून आणखी एक मोठी खेळी पाहण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय क्रिकेट संघ २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करणार आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने रोहित शर्माच्या जागी शुबमन गिलकडे एकदिवसीय संघाची धुरा सोपवली आहे.
हेही वाचा – Irani Cup 2025 : विदर्भाने इराणी करंडकावर तिसऱ्यांदा कोरलं नाव! रेस्ट ऑफ इंडियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा
विराट कोहलीच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. जपान क्रिकेट संघाच्या पोस्टमुळे निर्माण झालेला गोंधळ आता निवळला असून, कोहली भारतीय संघाकडूनच मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोहली कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





