Moshi Murder Case : दारूची नशा अन् सिलिंडरचा घाव! मोशीत कामगाराची निर्घृण हत्या; कारण वाचून हादराल
Moshi Murder Case : शंकेश्वर स्पर्श प्रोजेक्टमधील लेबर कॅम्पमध्ये खळबळ; आरोपीला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Moshi Murder Case – मोशी येथील एका बांधकाम साईटवर जेवण बनविण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कामगाराची सिलिंडरच्या टाकीने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी (९ मार्च) रात्री शंकेश्वर स्पर्श प्रोजेक्ट, कुदळे वस्ती येथील लेबर कॅम्पमध्ये घडली. बालाजी मारोती रेड्डी खंदाडे (२९, हंगरगा, मुखेड, नांदेड) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे.
या प्रकरणात अनिकेत विनायक भुरे (२१, भालचंद्र उपवन सोसायटी, पुनावळे, पुणे; मूळ पत्ता: समुद्राळ, उमरगा, धाराशिव) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रदीप विठ्ठल गुंडरे (३१, दक्षिण लक्ष्मीनगर, मोशी, पुणे; मूळ पत्ता: आंदोरी, अहमदपूर, लातूर) या आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवक आणि आरोपी हे नातेवाईक असून दोघेही हवालदार वस्ती येथील एका कन्स्ट्रक्शन साइटवर मजूर म्हणून काम करत होते. त्याच ठिकाणी ते राहत होते. सोमवारी रात्री दारू पिल्यानंतर जेवण बनविण्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. यात आरोपी प्रदीप याने बालाजी याच्या डोक्यात सिलिंडरची टाकी घातली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी तपास करीत आहेत.





