Building Collapse : मोठी दुर्घटना..! पुण्यात इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली 14 लोक अडकल्याची भीती; मोशी परिसरात खळबळ
Building Collapse : पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी दुर्घटना समोर आली आहे.

Building Collapse : पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखाली जवळपास 14 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. (Building Collapse)
सुनेत्रा पवार यांच्या तातडीच्या सूचना
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद सिंगल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी तसेच पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना दिल्या. (Building Collapse)
Building Collapse: मुंबईमध्ये कोसळधार! मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळून 6 जणांचा मृत्यू
दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, तसेच जखमींवर तातडीने आणि प्रभावी वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. (Building Collapse)
उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. (Building Collapse)

या घटनेबाबत बोलताना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी म्हटले की, मोशी या ठिकाणी कचरा डेपो भागात इमारत कोसळली आहे. यामध्ये जवळपास वीस लोक होते त्यामधील पाच लोक वाचवले आहेत आणखी 15 लोक अडकलेले आहेत. अडकलेल्या लोकांसोबत एनडीआरएफ जवानांचा संपर्क होत आहे. त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. (Building Collapse)
Building Collapse : मोठी दुर्घटना..! ३ मजली इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू, मानखुर्द परिसरातील घटना
Gujarat Building Collapse : गुजरातेत इमारतीचा स्लॅब कोसळून 17 जण जखमी..





