तहसीलदाराला जीवे मारण्याची धमकी, अमरावतीच्या ‘या’ आमदाराला तीन महिन्यांची शिक्षा अन् 15 हजारांचा दंड

अमरावती – तहसीलदाराला जीवे मारण्याची धमकी व माईक अंगावर फेकल्या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी तीन महिन्यांची शिक्षा व 15 हजारांचा दंड न्यायालयाने सुनावला आहे.
2013 साली देवेंद्र भुयार हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर वरुड तहसील कार्यालयात गेले होते. शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशीरा का होते तुम्ही माझा फोन कट का केला? असा दम देवेंद्र भुयार यांनी तत्कालीन तहसीलदार राम लंके यांना भरला होता. इतकेच नाही तर तहसीलदार लंके यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. भुयार हे त्यावेळी पंचायत समिती सदस्य होते.
दरम्यान, तहसीलदार राम लंके यांनी देवेंद्र भुयार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा सिद्ध झाल्यावर न्यायालयाने सात वर्षानंतर यावर सुनावणी करत शिक्षा सुनावली आहे.





