पुणे – राज्यातील ५७ नगरपरिषदांमध्ये आरक्षणाचे प्रमाण ५०% पेक्षा जास्त आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपरिषदेचा समावेश होतो. महाराष्ट्रातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींमध्ये मंगळवारी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून बुधवारी ३ डिसेंबर रोजी त्याचा निकाल लागणार आहे. राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४० नगरपरिषदा आणि १७ नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. दौंड हे त्यामधील एक प्रमुख ठिकाण आहे. असे असले तरिही मतदानाच्या तारखांमध्ये कसलाही बदल होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने जानेवारी २०२१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे या निवडणुका होतील. मात्र या निवडणुकांचा निकाल रिट पिटीशनच्या सुनावणीनंतर जाहीर केला जाईल. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मते १७ नगरपंचायतींमध्ये मतदान नेहमीप्रमाणे होईल. मात्र दौंडचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर लागेल. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा आहे, त्या सर्व ठिकाणचे निकाल हे न्यायालयाच्या निर्णयानंतर लागतील. राज्यात दोन महापालिकांमध्ये ही आरक्षणाची मर्यादा ५०% पेक्षा जास्त असल्याने तेथील निकालही सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर जाहीर केली जाते. 50% पेक्षा जास्त आरक्षण असलेले मतदार संघ : १. अमरावती ४ २. छत्रपती संभाजी नगर ५ ३. कोकण १ ४. नागपूर ३० ५. नाशिक ९ ६. पुणे १ (दौंड) 50% पेक्षा जास्त आरक्षण असलेले नगरपंचायती : १. अमरावती ४ २. कोकण १ ३. नागपूर ११ ४. नाशिक १