महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत 1000 पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mahakumbh Stampede | प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यादिवशी संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीत 30 हून जास्त जणांचा आपले प्राण गमवावे लागल्याचे म्हंटले जात आहे. परंतु मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या उत्तर प्रदेश सरकारने सांगितलेल्या संख्येपेक्षा जास्त आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
‘महाकुंभात प्रत्यक्षात 1000 पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाला आहे. काही मृत भाविकांची वाहने अजूनही अनेक दिवसांपासून पार्किंगमध्ये पडून आहेत. कदाचित योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासनही वाहने लपवायला विसरले असतील,’असे आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांचे ट्वीट
प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या मोठी आहे. परंतु उत्तर प्रदेश प्रशासनाने ही संख्या खोटी सांगितली आहे. योगी आदित्यनाथ यांनी केलेले हे सर्वात मोठे कव्हर-अप आहे. मृत भाविकांची संख्या लपविण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी भाविकांचा मृतदेह हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार न करता भट्टीत दहन केले आहे.”
यूपी प्रशासन द्वारा बताई गई महाकुंभ भगदड़ में मरने वाले श्रद्धालुओं की संख्या झूठी है; ये योगी आदित्यनाथ का सबसे बड़ा कवर-अप है।
योगी आदित्यनाथ ने मरने वाले श्रद्धालुओं की संख्या को छुपाने के लिए मृत श्रद्धालुओं के शवों को बिना हिन्दू रीति-रिवाज के भट्टी में जलवा दिया है।
मुझे… pic.twitter.com/UGvShj4bhf
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 8, 2025
यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रकाश आंबेडकर यांनी काही प्रश्न विचारले आहेत. “योगी आदित्यनाथ या भाविकांच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात की पंतप्रधान मोदी?, योगी आदित्यनाथ या मृत भाविकांच्या कुटुंबियांना तुम्ही काय उत्तर द्याल?, कोणीतरी तिचा पती गमावला आहे, कोणीतरी तिचा भाऊ गमावला आहे तर कोणीतरी तिचा बाप गमावला आहे. तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल?, योगी आदित्यनाथ, हिंदू विधी न पाळता त्यांच्या हिंदू भक्तांचे मृतदेह भट्टीत का जाळले?”
पुढे त्यांनी लिहिले,”एखाद्याच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करणे किती महत्त्वाचे आहे, हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. योगी आदित्यनाथ यांनी खोटे बोलून आणि हिंदू विधी न पाळता त्यांचे मृतदेह भट्टीत जाळून हिंदू भाविकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना फसवले आहे,” असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा खरा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही, असा दावा केला होता.
हेही वाचा:





